Join us

आयुषमानशी तुलना होताच तापसी पन्नूची सटकली...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 11:43 IST

एका निर्मात्याने तापसीला ‘लेडी आयुषमान’ म्हणत तिची आयुषमान खुराणासोबत तुलना केली आणि तापसी संतापली.

ठळक मुद्दे. तापसीची नाराजी तनुज यांना अगदी बरोबर कळली. मग काय, तनुज यांनी सारवासारव करत पुन्हा एकदा ट्वीट केले.

तापसी पन्नू म्हणजे बॉलिवूडची परखड अभिनेत्री. ट्रोलर्सची बोलती बंद करणारी अभिनेत्री अशी तिची ओळख करून दिली तर अतिशयोक्ती होणार नाही. आता हेच बघा ना, एका निर्मात्याने तापसीला ‘लेडी आयुषमान’ म्हणत तिची आयुषमान खुराणासोबत तुलना केली आणि तापसी संतापली. तिने या निर्मात्यांला सणसणीत उत्तर दिले. गत 15 फेब्रुवारी 2020 ला आसामच्या गुवाहाटीमध्ये फिल्मफेअर 2020 चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अभिनेत्री तापसी पन्नूला ‘सांड की आंख’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रिटीक अवॉर्ड फॉर बेस्ट अ‍ॅक्टर (फिमेल) पुरस्कार देऊन तिला गौरविण्यात आले. साहजिकच तापसीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. चित्रपट निर्माता तनुज गर्ग यांनीही तापसीचे अभिनंदन केले. पण हे अभिनंदन करताना ते चुकले.

होय, अभिनंदनाचे ट्वीट करताना त्यांनी तापसीला ‘फिमेल आयुष्मान खुराना’ असे संबोधले. ‘आमच्या बॉलीवूडची फिमेल आयुष्मान खुराना आणि पॉवर हाऊसला खूप सा-या शुभेच्छा,’ असे  ट्विट त्यांनी केले. पण हे ट्विट पाहून   तापसीची सटकली. अगदी चांगलीच सटकली..

यावर तापसीने सणसणीत रिप्लाय  दिला. ‘त्यापेक्षा तुम्ही मला बॉलीवूडची पहिली तापसी पन्नू म्हणू शकता’, असे तनुज गर्ग यांना उत्तरादाखल तिने लिहिले. तापसीची नाराजी तनुज यांना अगदी बरोबर कळली. मग काय, तनुज यांनी सारवासारव करत पुन्हा एकदा ट्वीट केले. ‘ती तर तु आहेसच, सगळ्यात वेगळी,’ असे त्यांनी लिहिले.तापसीच्या या उत्तरावर चाहत्यांनी ब-याच कमेंट्स केल्या आहेत. व्वा, काय उत्तर दिलेस, अशा एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले. एका उत्तरात बोलती बंद... असे अन्य एका चाहत्याने लिहिले.

 

टॅग्स :तापसी पन्नू