भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे पर्यटनस्थळांवरील फोटो शेअर करत असतात. त्यातही कोरोनामुळे सारेच घरात बंदिस्त झाले होते. हळुहळु सर्वच पूर्वपदावर येत आहे.
त्यामुळेच कामाला सुरूवात करण्यापूर्वी रिफ्रेश व्हायचे तापसी पन्नुने ठरवले आहे. म्हणूनच की काय ती सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पुलशेजारी दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या हॉटेलच्या रुममध्ये दिसते आहे. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. लॉकडाऊनमुळे काही महिने घरातच बंदिस्त असल्यामुळे प्रत्येकालाच मोकळा श्वास घ्यायचा आहे. तसेच लॉकडाऊनपूर्वीही नेहमीचं शूटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढणे तसेही अवघडच होते. त्यामुळे कोरोनाकाळातही तापसी मस्त हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर तिने शेअर केलेले व्हेकेशनचे फोटो चांगलेच ट्रेंड होत आहेत. व्हॅकेशनसाठी तापसी एकटीच गेली नसून तिची बहिण तिच्यासोबत आहे. दोघेही मिळुन धम्माल करत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करणं यातून आपल्याला आनंद मिळतो हे सांगायलाही ती विसरत नाहीत.
तापसी पन्नूला कधीकाळी मिळाला होता ‘बॅड लक हिरोईन’चा टॅग!
तापसी सॉफ्टवेअर इंजिनीअर असून तिने सहा महिने नोकरी केली. त्यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली. मॉडेलिंग करत असताना तिला तेलुगू चित्रपटसृष्टीतून चित्रपटाच्या ऑफर येण्यास सुरुवात झाली.आज ती बॉलिवूडची टॉप लीड अॅक्ट्रेस आहे. अपार कष्ट, जिद्द, चिकाटी या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये असे काही यश मिळवले की ‘बॅड लक हिरोईन’ म्हणणा-यांची तोंड बंद झालीत.
पंजाबी घरात जन्मास आलेल्या तापसीने 2010 मध्ये ‘झुम्माण्डि नादां’ या तेलगू चित्रपटातून आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली. पण करिअरच्या सुरुवातीला तिला बºयाच वाईट अनुभवातून जावे लागले. एक वेळ अशी आली की लोक तिला‘बॅड लक हिरोईन’ म्हणू लागले.
कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंग करुन तापसी पॉकेट मनी कमवत होते. कॅट परिक्षेत 88% मिळवल्यानंतर एमबीए करण्याच्या विचारात असताना तिला अचानक सिनेमाची ऑफर आली. तिने ही ऑफर स्वीकारली. पण तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतरचे सलग दोन सिनेमेही आपटले. यानंतर सर्वच तिला ‘बॅड लक हिरोईन’ समजू लागले.