Join us

'कृपा करा आणि बाजूला व्हा'; सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर संतापली तापसी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 2:32 PM

Taapsee pannu: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तापसी एका सिनेमाचं स्क्रिनिंग संपवून बाहेर पडत होती. याचवेळी तिला पाहिल्यावर चाहत्यांनी तिच्या भोवती गर्दी केली.

अभिनय कौशल्यापेक्षा आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू (Taapsee pannu). कलाविश्वाप्रमाणेच तापसी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर तिची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. यात सध्या सोशल नेटवर्किंगवर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात ती एका चाहत्यामुळे वैतागल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तापसी एका सिनेमाचं स्क्रिनिंग संपवून बाहेर पडत होती. याचवेळी तिला पाहिल्यावर चाहत्यांनी तिच्या भोवती गर्दी केली. यात एक चाहता सातत्याने तिच्याकडे सेल्फीसाठी मागणी करत होता. परंतु, त्याचं अंगलट येणं तापसीला खटकलं आणि तिने त्याला फटकारलं.

'कृपा करा आणि बाजूला व्हा', असं म्हणत तापसीने या चाहत्याला हाताने बाजूला सरकवलं. तसंच रागारागत ती तिच्या गाडीत जाऊन बसली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, तापसी लवकरच हसीन दिलरुबा या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे ती या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. या सिनेमात तिच्यासोबत विक्रांत मेस्सी आणि सनी कौशल स्क्रीन शेअर करणार आहेत.

टॅग्स :बॉलिवूडतापसी पन्नूसेलिब्रिटीसिनेमाविक्रांत मेसीसनी कौशल