Join us  

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तापसी पन्नूही जाणार, बॅडमिंटनपटू मॅथियसशी लग्नानंतर पहिल्यांदाच लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 5:34 PM

मॅथियस २०१२ साली ऑलिम्पिक मेडल जिंकून परत आला तेव्हा दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आगामी 'फिर आयी हसीन दिलरुबा' सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या ती सिनेमाचं जोरदार प्रमोशनही करत आहे. काही महिन्यांपूर्वीच तापसीने बॉयफ्रेंड मॅथियस बोएसोबत लग्न केलं. माथियास हा बॅडमिंटनपटू आहे. त्याने ऑलिम्पिकमध्ये मेडलही पटकावलं आहे. यंदा होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) तापसी पन्नू नवऱ्याला चीअर करण्यासाठी हजेरी लावणार आहे.

तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड मॅथियस बोए २०२१ पासून चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या दोन भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे. आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मॅथियस स्वत: तिथे हजर असणार आहे. तर तापसीही नवऱ्यासोबत जाणार आहे. याबद्दल तापसी म्हणते, "मला नाही वाटत मी एक अॅथलीट म्हणून तिथे जात आहे(हाहा) मॅथियस २०१२ साली ऑलिम्पिक मेडल जिंकून परत आला तेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले. त्याच्या पुढील ऑलिम्पिकमध्ये त्याने खेळाडू म्हणून सहभाग घेतला तेव्हा मी गेले नाही. कारण त्याला खेळताना पाहून मी खूप पॅनिक होते."

ती पुढे म्हणाली,"हे वर्ष मी ऑलिम्पिकला जाण्यासाठी खूप चांगलं आहे. कारण माझा नवरा टीमचा कोच आहे आणि चिराग, सात्विक हे पदक जिंकण्यासाठी उत्तम दावेदार आहेत. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मी जात आहे. तसंच १ ऑगस्ट रोजी माझा वाढदिवस आहे तेव्हाच सामने होण्याची शक्यता आहे. हे सुद्धा माझं ऑलिम्पिकला जाण्यासाठी मुख्य कारण आहे."

तापसी 29 जुलै रोजी पॅरिसला पोहोचणार आहे. तोपर्यंत टीमने दोन सामने खेळलेले असणार आहेत. पण खेळाडू फायनलला जातील अशी तिला आशा आहे. म्हणून तिने फायनलनंतरचेच रिटर्न तिकीट बुक केले आहेत. 

टॅग्स :तापसी पन्नूबॉलिवूडपॅरिस ऑलिम्पिक २०२४Badminton