तापसी पन्नू बॉलिवूडची गुणी अभिनेत्री आहे. गत काही वर्षांत तापसीने एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिलेत. या चित्रपटातील तापसीच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. समीक्षकांनीही तापसीला दाद दिली. तापसी पन्नूने २०१० साली तेलुगू सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तापसीने तमिळ व मल्याळी सिनेमांमध्ये काम केले आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'चष्मे बद्दूर' या सिनेमातून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती २०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'पिंक' सिनेमामधून. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तापसी लवकरच बायोपिकमध्ये दिसणार आहे. क्रिकेटर मिताली राजची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर बायोपिक तयार करण्यात येणार.
तापसीच्या झोळीत आणखी एक दमदार प्रोजेक्ट, तुम्हीही वाचून व्हाल खूश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 14:36 IST
तापसी पन्नू बॉलिवूडची गुणी अभिनेत्री आहे. गत काही वर्षांत तापसीने एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिलेत. या चित्रपटातील तापसीच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले.
तापसीच्या झोळीत आणखी एक दमदार प्रोजेक्ट, तुम्हीही वाचून व्हाल खूश
ठळक मुद्देतापसी लवकरच बायोपिकमध्ये दिसणार आहे