Join us

तापसी पन्नूच्या पतीचं पॅरिस ऑलिम्पिकसोबत कनेक्शन नेमकं काय? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 14:45 IST

तापसी पन्नूच्या पतीला पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंसोबत बघून सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यामागचं कारण ऐकून मात्र तुम्हालाही बसेल सुखद धक्का

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू कायम विविध कारणांमुळे चर्चेत असते. तापसीने आजवर विविध सिनेमांमधून तिच्या अभिनयाची छाप पाडलीय. तापसीने काही महिन्यांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड मॅथियस बेसोबत लग्न केलं. तापसीचा नवरा नेमकं काय काम करतो, याची अनेकांना कल्पना नव्हती. अशातच तापसीच्या नवऱ्याला अनेकांनी पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये भारताचा तिरंगा हातात धरताना पाहिलं. कोण आहे तापसीचा पती मॅथियस? त्याचं पॅरिस ऑलिम्पिक्ससोबत कनेक्शन काय? जाणून घ्या.

तापसीचा पती मॅथियस बॅडमिंटन कोच

फार कमी जणांना ठाऊक असेल की, तापसी पन्नूचा पती मॅथियस बे हा बॅडमिंटन कोच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो साईरजा रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी अशा बॅडमिंटन प्लेयर्सना कोचिंग देत आहे. मॅथियस मूळचा डेन्मार्कचा असून तो तिकडचा माजी बॅडमिंटनपटू आहे. अलीकडेच मॅथियसने भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण, पी.व्ही.सिंधू यांच्यासोबत फोटो शेअर केलाय. पॅरिस ऑलिम्पिक्स २०२४ मध्ये मॅथियस हा भारतीय बॅडमिंटनपटूंसोबत सहभागी झालाय. 

मॅथियसला कोणी ओळखत नाही याची तापसीला खंत

मॅथियसला कोणी ओळखत नाही याची तापसीला खंत आहे. तापसी फीवर FM ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी म्हणाली की, "माझा नवरा कोणी क्रिकेटर किंवा बिझनेसमन नाही. त्यामुळे त्याच्याविषयी कोणाला माहित नाही. पण माझ्या नवऱ्याने जगभरात बॅडमिंटन खेळात चांगलं यश मिळवलं आहे. भारतीय मेन्स डबल्स आज जे नाव कमावत आहे त्यामध्ये मॅथियसचाही महत्वाचा वाटा आहे. परंतु कोणाही मीडियाला हे माहित नाही." अशाप्रकारे भारतीय बॅडमिंटनपटूंना कोचिंग देत तापसीचा नवरा मॅथियस सध्या पॅरीस ऑलिम्पिकमध्ये भारताची शान वाढवायला सज्ज आहे.

टॅग्स :तापसी पन्नूपॅरिस ऑलिम्पिक २०२४Badmintonबॉलिवूड