२००७ साली रिलीज झालेला आमिर खानचा (Aamir Khan) 'तारे जमीन पर' सिनेमा आठवत असेलच. पालकांना आणि शिक्षकांना शिकवण देणारा हा सिनेमा होता. या सिनेमाने मुलांना समजून घेण्याची शिकवण दिली. सिनेमात दर्शिल सफारी (Darsheel Safary) या बालकलाकाराने भूमिका साकारली होती. त्याचा अभिनय सर्वांनाच भावला. तर आमिर खानने त्याच्या शिक्षकाची भूमिका साकारली होती. दर्शिलला तर या सिनेमाने खरी ओळख दिली.
दर्शिल सफारीला बालकलाकार म्हणून जे यश मिळालं ते नंतर मिळालं नाही. अभिनेता म्हणून त्याला अद्याप बॉलिवूडमध्ये स्थान मिळवला आलेलं नाही. एका मुलाखतीत तो म्हणाला," तारे जमीन पर नंतर लोक मला सतत विचारत होते की अजूनही आमिर खानसोबत काही संपर्क आहे का? त्याच्याकडे काम माग पण मला असं करायचं नव्हतं. मला लाज वाटायची. मला माहित नव्हतं की हे कसं करायचं. मला असं वाटतं संधी स्वत:हून चालून येतात. मी कधीच आमिर अंकलकडे काम मागितलं नाही.'
तो पुढे म्हणाला,"माझ्या प्रत्येक प्रोजेक्टबद्दल आमिर अंकलला माहित असतं. त्यांचा आशिर्वाद असावा म्हणून मी त्यांना याविषयी सांगतो. दर्शिल सफारी 'कच्छ एक्सप्रेस' मध्ये दिसला होता. विरल शाह यांनी सिनेमा दिग्दर्शित केला होता. तसंच तो अॅमेझॉन मिनी टीव्हीवरील एका वेबसिरीजमध्येही दिसला.