Join us

तब्बू सांगतेय, अजय देवगणमुळे आजवर झाले नाही माझे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 8:00 PM

अजय आणि तब्बू यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत.

ठळक मुद्देमाझ्याशी कोणीही मुलगा बोलण्यासाठी आल्यास माझा चुलत भाऊ समीर आणि अजय त्यांना धमकावत असत. आजही मी अविवाहित ते फक्त अजय देवगणमुळेच.

तब्बूचादे दे प्यार दे हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात तिच्यासोबतच अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. अजय आणि तब्बू यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. मी अविवाहित असण्याला अजयच जबाबदार असल्याचे तब्बूने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते. 

तब्बूचा विजयपथ हा सिनेमा तिच्या करियरला कलाटणी देणारा ठरला. 1994 मध्ये विजयपथ या चित्रपटात अजय देवगणसोबत ती मुख्य भूमिकेत झळकली होती. तब्बू आणि अजयची जोडी प्रेक्षकांना त्या चित्रपटापासूनच प्रचंड आवडते. 

तब्बूने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी आणि अजय आम्ही गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, अजय हा माझ्या चुलत भावाच्या शेजारी राहत होता. तसेच त्यावेळी तो माझा खूप चांगला मित्रसुद्धा होता. माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून अजय माझ्यासोबत आहे. त्या काळात माझा चुलत भाऊ समीर आणि अजय दोघे सतत माझ्यासोबत असायचे. प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर यायचे. माझ्याशी कोणीही मुलगा बोलण्यासाठी आल्यास हे दोघे त्यांना धमकावत असत. आजही मी अविवाहित ते फक्त अजय देवगणमुळेच. त्याने माझ्यासोबत काय केले या गोष्टीचा अजय देवगणला केव्हा तरी नक्कीच पश्चात्ताप होईल, असं तब्बू म्हणाली होती. 

तब्बू आणि अजयने हकीकत, तक्षक, फितूर आणि दृश्यम यांसारख्या अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. 

तब्बूच्या या खुलाशानंतर चित्रपटसृष्टीत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. अभिनेत्री तब्बूचे आजही अनेक चाहते आहेत. 90 च्या दशकात तब्बूच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 1980 मधल्या बाजार चित्रपटात तब्बू पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांत काम केले. माचिस, चांदनी बार या चित्रपटांमधील भूमिकांसाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

टॅग्स :अजय देवगणतब्बूदे दे प्यार दे