बॉलिवूड अभिनेत्री तब्बू 49 वर्षांची झाली. बऱ्याच चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तब्बूची गणना होते. तब्बू गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्राचा भाग असली तरी ती कॉन्ट्रोव्हर्सींपासून दूर राहाणेच पसंत करते. ती तिचे खाजगी आणि व्यवसायिक आयुष्य नेहमीच वेगवेगळे ठेवते. तब्बू अद्याप लग्न केलेले नाहीये.
तब्बू आजही अविवाहित आहे, पण याबद्दल ती काहीही बोलणेच नेहमी टाळते. पण ती अविवाहित असण्याला केवळ बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण जबाबदार असल्याचे तिने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. तब्बू आणि अजय देवगण यांची २५ वर्षांपासूनची ओळख आहे. अजय हा तब्बूचा चुलत भाऊ समीर आर्याचा शेजारी होता. त्यामुळे तब्बू आणि अजय यांची अनेक वर्षांपासून खूपच चांगली मैत्री आहे.