Join us

अजय देवगणमुळे आजही अविवाहित आहे ही अभिनेत्री, या अभिनेत्रीनेच दिली होती कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 2:13 PM

या अभिनेत्रीनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते.

ठळक मुद्देआजही मी अविवाहित आहे ते फक्त अजय देवगणमुळेच. त्याने माझ्यासोबत काय केले या गोष्टीचा अजय देवगणला केव्हा तरी नक्कीच पश्चात्ताप होईल, असं तब्बू म्हणाली होती.

अजय देवगणचा आज वाढदिवस असून त्याने फूल और काटे, हम दिल दे चुके सनम, जख्म, गंगाजल, गोलमाल सिरीज, सिंघम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याला त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्याच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या तानाजीः द अनसंग वॉरियर या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. अजयला आज बॉलिवू़डमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये एक मानले जाते.

अजय देवगण आणि तब्बू यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. गेल्या वर्षी त्यांच्या प्रदर्शित झालेल्या दे दे प्यार दे या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. अजय आणि तब्बू खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. मी अविवाहित असण्याला अजयच जबाबदार असल्याचे तब्बूने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते. तब्बूचा विजयपथ हा सिनेमा तिच्या करियरला कलाटणी देणारा ठरला. 1994 मध्ये विजयपथ या चित्रपटात अजय देवगणसोबत ती मुख्य भूमिकेत झळकली होती. तब्बू आणि अजयची जोडी प्रेक्षकांना त्या चित्रपटापासूनच प्रचंड आवडते.

तब्बूने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी आणि अजय आम्ही गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, अजय हा माझ्या चुलत भावाच्या शेजारी राहत होता. तसेच त्यावेळी तो माझा खूप चांगला मित्रसुद्धा होता. माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून अजय माझ्यासोबत आहे. त्या काळात माझा चुलत भाऊ समीर आणि अजय दोघे सतत माझ्यासोबत असायचे. प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर यायचे. माझ्याशी कोणीही मुलगा बोलण्यासाठी आल्यास हे दोघे त्यांना धमकावत असत. आजही मी अविवाहित आहे ते फक्त अजय देवगणमुळेच. त्याने माझ्यासोबत काय केले या गोष्टीचा अजय देवगणला केव्हा तरी नक्कीच पश्चात्ताप होईल, असं तब्बू म्हणाली होती. 

तब्बू आणि अजयने हकीकत, तक्षक, फितूर आणि दृश्यम यांसारख्या अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे.

टॅग्स :अजय देवगणतब्बू