तब्बूने ग्लॅमरस अवतारातील व्हिडिओ केला शेअर, नेटिझन्सने दिल्या अशा भन्नाट कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 07:44 PM2019-07-22T19:44:37+5:302019-07-22T19:46:21+5:30
तब्बूने इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तब्बूचा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत असून या अंदाजावर तिचे चाहते फिदा झाले आहेत.
तब्बू गेली अनेक वर्षं बॉलिवडमध्ये काम करत असून तिने एक बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिची मोठी बहीण फराह नाझ देखील अभिनेत्री असून तब्बू लहान असताना अनेकवेळा बहिणीसोबत चित्रपटाच्या सेटवर येत असे. तब्बूने बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर कुली नं. १ या तेलगु चित्रपटाद्वारे एक नायिका म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर पहला पहला प्यार या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिचा हा चित्रपट फ्लॉप झाला. पण विजयपथ या चित्रपटामुळे तिच्या करियरला कलाटणी मिळाली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतरचे तिचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. पण हकीगत या चित्रपटामुळे तिला पुन्हा यश मिळाले.
आज तब्बूला बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक मानले जाते. तब्बूचा दे दे प्यार दे हा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तब्बूला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे फॅन्स तिला सोशल मीडियावर नेहमीच फॉलो करतात. तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तब्बूचा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत असून या अंदाजावर तिचे चाहते फिदा झाले आहेत.
या ग्लॅमरस अंदाजात तब्बू खूपच छान दिसत आहे असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. केवळ सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील तिच्या या अंदाजाच्या प्रेमात पडले आहेत. तू खूपच छान दिसत आहेस असे सोनाली बेंद्रने कमेंटद्वारे सांगितले आहे तर फराह खानने देखील तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
तब्बूच्या सौंदर्यासोबतच तिच्या अभिनयाचे देखील नेहमीच कौतुक केले जाते. चांदनी बार, अस्तित्व, चीनी कम यांसारख्या अनेक चित्रपटांमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच तिला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. तब्बूला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे.