तब्बू असो किंवा मग तापसी पन्नू किंवा मग अनुष्का शर्मा... यांची नावे इंटरनेटवर सर्च करणे तुम्हाला महागात पडू शकते. होय, तुम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींचे चाहते असाल आणि तब्बू,तापसी, अनुष्का अशा काही सेलिब्रिटींबाबत सर्च करत असाल तर थोडे सतर्क राहण्याची गरज आहे. कारण यांच्याबद्दल सर्च करणे म्हणजे, धोका. इंटरनेटवर या व अशा काही सेलेब्रिटींच्या नावाने सर्च करताना तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये व्हायरस येण्याची शक्यता सर्वाधिक आहे.Mcafee या नावाची अँटिव्हायरस तयार करणारी सायबर सिक्युरिटी क्षेत्रातली कंपनी दरवर्षी एक धोकायदायक सेलेब्रिटींची यादी जाहीर करते. यांची नावे इंटरनेटवर सर्च करणे धोकादायक आहे, असा याचा अर्थ. या माध्यमातून तुम्ही चुकीच्या वेबलिंक्स क्लिक करून डिजिटल फ्रॉड वा व्हायरसचे शिकार ठरू शकता. या कंपनीने यंदा अशाच 10 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. यात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची नावे आहेत.
मॅकफीने जाहीर केलेल्या या जागतिक यादीत सर्वोच्च स्थानी फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचे नाव आहे. आश्चर्य म्हणजे, या यादीत दुस-या स्थानावर आहे ती बॉलिवूड अभिनेत्री तब्बू. तिस-या क्रमांकावर आहे अभिनेत्री तापसी पन्नू. चौथ्या स्थानावर अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि पाचव्या स्थानावर सोनाक्षी सिन्हा यांची नावे आहेत.
पाचनंतरच्या पुढच्या पाचही क्रमांकांवर बॉलिवूडच्याच सेलेब्रिटीच आहेत. सहाव्या क्रमांकावर गायक अरमान मलिक आहे. सातव्या क्रमांकावर सारा अली खान आहे. आठव्या स्थानावर टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी तर नवव्या स्थानावर शाहरुख खान आहे. नवव्या स्थानावर शाहरुख खान आहे. या यादीत दहाव्या स्थानावर गायक अरिजित सिंग आहे.
फुकट वेबसीरिज, चित्रपट, गाणी किंवा खेळाचे सामने पाहण्याच्या मोहात अनेक लोक चुकीच्या गोष्टींना क्लिक करतात आणि डिजिटल फ्रॉडला बळी पडतात. काही सेलिब्रिटींची नावे सर्च करणेही महागात पडू शकते. यामाध्यमातूनही तुम्ही धोकादायक साईड्वर थेट पोहोचता आणि फ्रॉडला बळी पडता, असे मॅकफी इंडियाचे उपाध्यक्ष व्यंकट कृष्णपूर यांनी म्हटले आहे.