Join us

तब्बूला करायचंय या कलाकारासोबत पुन्हा एकदा काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 17:57 IST

अभिनेत्री तब्बूचा नुकताच 'अंधाधुन' हा चित्रपट प्रदर्शित झाला व या सिनेमातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले.

ठळक मुद्देतब्बू दिसणार भारत चित्रपटात

अभिनेत्री तब्बूला दिग्गज गीतकार व संगीतकार गुलजार यांच्यासोबत काम करायचे आहे. तब्बूने 'माचिस', 'हू तू तू' या चित्रपटांमध्ये गुलजार यांच्यासोबत काम केलेले आहे. 

तब्बूने ९२.७ बिग एफएमवरील 'बिग एमजे ऑफ द वीक' या शोमध्ये सांगितले की, माझ्याकडे गुलजार यांच्यासाठी संदेश आहे, कृपया लवकर एक चित्रपट बनवा व त्यात मला घ्या. जर तुम्ही मला अभिेनेत्री म्हणून नाही घेऊ शकत तर असिस्टंट म्हणून ठेवा. या शोमध्ये तब्बू आरजे बनली होती आणि त्यावेळी तिने तिच्या सिनेमा व भूमिकांबद्दल सांगितले. नुकताच तिचा थरारपट 'अंधाधुन' प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने केलेली ग्रे शेड भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. याव्यतिरिक्त तिने हैदर व फितूरमध्ये निगेटिव्ह भूमिका केलेली आहे. याबद्दल सांगताना तब्बू म्हणाली की, मला ग्रे शेड पात्र इंटरेस्टिंग वाटतात. अनेक चित्रपटांमध्ये मी अभिनेत्रीची भूमिका केली. मात्र मला ग्रे शेड भूमिका करायला आवडतात. यामध्ये आपण दोन्ही बाजूच्या भूमिका साकारतो. यामुळे तुम्ही ती भूमिका अधिक चांगल्यारितीने मांडू शकता. मागील काही वर्षांमध्ये मी विविध भूमिका साकारल्या. मी साकारलेल्या भूमिकाच माझी ओळख बनली. मला अशा भूमिका करून आनंद मिळतो.

तब्बू सलमान खानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'भारत'मध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. मात्र, तब्बू सिनेमात काय भूमिका करणार याचा अजून खुलासा झाला नाही.  

टॅग्स :तब्बूगुलजार