ताहिर राज भसिन म्हणजे पडद्यावर हमखास दमदार परफॉर्मन्स देणारा कलाकार अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. कबीर खान दिग्दर्शित ८३ या बहुप्रतिक्षित सिनेमात हा तरुण अभिनेता सुनील गावसकर यांची भूमिका बजावणार आहे. १९८३ साली 'अंडरडॉग' समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने विश्वकप जिंकून अद्वितीय कामगिरी केली, त्याची ही कथा आहे. सरकारने अखेर चित्रपटगृहे खुली करण्यास हिरवा कंदील दाखवल्याने ताहिरने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
"यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मल्टिप्लेक्स मधील हजारो कर्मचारी आणि चित्रपटगृहांवर आधारित व्यवसायांना आता अखेर मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात या क्षेत्राला फारच काळ बंद रहावे लागले. आता या निर्णयामुळे 83 चित्रपटगृहांमध्ये कधी प्रदर्शित होतो, याची मी वाट पाहतोय. हा सिनेमा चित्रपटगृहांना क्रिकेट स्टेडिअमचं रूप देईल. हा सिनेमा खरंतर मोठ्या पडद्यासाठीच बनला आहे," असे ताहिर म्हणाला.
मास्क घालणे, अंतर राखणे आणि कोविड-19 ची लक्षणे दिसल्यास घराबाहेर पडणे टाळणे या नियमांचे पालन आपण स्वत:हून करायला हवे. देशातील सर्वात लोकप्रिय मनोरंजनाचा पर्याय पुन्हा खुला होत असताना आपण 'न्यू नॉर्मल'च्या मर्यादा जाणीवपूर्वक पाळायला हव्यात."