Join us

नकली केस लावून लावून मी थकले! आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यपने केले मुंडण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 11:13 AM

काही दिवसांपूर्वी सोनाली बेंद्रे हिने कॅन्सरवरील उपचारादरम्यान मुंडण केलेला फोटो शेअर केला होता. आता ताहिरानेही मुंडन केलेला फोटो शेअर केला आहे.

ठळक मुद्देआयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े.

सोनाली बेंद्रे, इरफान खान,राकेश रोशन, नफीसा अली या बॉलिवूड सेलिब्रिटींना कॅन्सरने ग्रासले असताना अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप हिलाही या आजाराने घेरले आहे. अर्थात ताहिरा या आजाराशी अगदी खंबीरपणे झुंज देतेय. काही दिवसांपूर्वी सोनाली बेंद्रे हिने कॅन्सरवरील उपचारादरम्यान मुंडण केलेला फोटो शेअर केला होता. आता ताहिरानेही मुंडन केलेला फोटो शेअर केला आहे.

‘हॅलो, हा माझा नवा अवतार आहे. नकली केस लावून लावून मी थकलेयं. आता मी अशी दिसतेयं. मी कधी केस कापेल, अगदी मुंडण करेल, अशी कल्पनाही मी केली नव्हती. पण आता मुंडण केल्यानंतर मला मस्त वाटतेय,’ असे ताहिराने लिहिलेय. ताहिराचा हा नवा अवतार तिचा पती आयुष्यमानलाही आवडला. त्याने ताहिराच्या पोस्टवर कमेंट करत, ‘हॉटी’ असे लिहिले.

 अलीकडे कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर ताहिरा कामावर परतली होती. पण काही दिवसांपूर्वी तिचा कॅन्सर पुन्हा परतला होता. होय, ताहिराचा ब्रेस्ट कॅन्सर 1२३ अ स्टेजवर पोहोचला होता. आधी तो 0 स्टेजवर होता. साध्या सोप्या शब्दात सांगायचे तर ताहिराला दुस-यांदा कॅन्सर डिटेक्ट झाला होता. स्वत: ताहिराने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली होती. ‘कॅन्सरबद्दल कळल्यावर तुम्ही त्याला बाहेरचा रस्ता दाखवता. पण हे अत्यंत कठीण आहे. अनेकदा आपल्याला आपल्या आतील शक्तीचा अंदाज येत नाही. माझ्या मते, आयुष्यात अनेक अडचणी येतात आणि या अडचणीचं तुम्हाला आणखी सहनशील, शक्तीशाली बनवतात. मला स्टेज 1२३ अ कॅन्सरचे निदान झाले आहे आणि यासाठी मला १२ किमोथेरपी घ्यावा लागणार आहेत. यापैकी सहा मी घेतल्या. आणखी सहा बाकी आहेत. कॅन्सरशी झुंज देण्याच्या आत्तापर्यंतच्या माज्या प्रवासाला मी ही माझी पोस्ट समर्पित करते. अर्धा प्रवास संपला...अर्धा बाकी आहे...’ असे ताहिराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. ताहिराच्या वडिलांना आयुष्यमान खूप आवडायचा. हा मुलगा तुला खूप आनंदी ठेवेन, असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. 

टॅग्स :आयुषमान खुराणा