Join us

Taimur Ali Khan च्या आयाच्या महिन्याच्या गलेलठ्ठ पगाराचा आकडा जाणून तुमचेही डोळे पांढरे पडतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 8:59 AM

तैमूर कायमच एका व्यक्तीसोबत सगळ्यात जास्त पाहायला मिळाला आहे. ही व्यक्ती कायमच छोटे नवाबसह त्याची सावली बनून असते. ही व्यक्ती म्हणजे तैमूरची देखभाल करणारी आया. 

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा लाडका लेक म्हणजेच छोटे नवाब तैमूर अली खान. स्टार किड्सपैकी सगळ्यात चर्चित चेहरा. तैमूरच्या बाल लीला अशा काही आहेत की तो नेहमीच चर्चेत असतो. चिमुकल्या तैमूरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. या फोटो आणि व्हिडीओंना तुफान लाईक्सही मिळतात. त्यामुळे सध्या बी-टाऊनच्या बातम्यांमध्ये तैमूरची जबरदस्त क्रेझ आहे. तैमूरच्या या लोकप्रियतेमुळे त्याच्या फॅन्सच्या नजरेतून एक गोष्ट चुकली नसावी. तैमूर कायमच एका व्यक्तीसोबत सगळ्यात जास्त पाहायला मिळाला आहे. ही व्यक्ती कायमच छोटे नवाबसह त्याची सावली बनून असते. ही व्यक्ती म्हणजे तैमूरची देखभाल करणारी आया. 

तैमूरची आया तैमूरप्रमाणेच लोकप्रिय होत आहे. छोटे नवाबचे आजोबा ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर एकदा गंमतीने म्हणाले होते की “माध्यमांच्या नजरा कायमच तैमूरवर असतात. त्यात काही गैरसुद्धा नाही. दररोर सकाळी उठलं की वर्तमानपत्रात तैमूरचा फोटो पाहायला मिळतो. यामुळंच की काय आता तैमूरची आया कोण आहे हे ही साऱ्यांना माहित झालं आहे, ते फक्त तैमूरवर माध्यमांची नजर असल्यामुळेच.”

तैमूरच्या याच खास आयाबद्दल एक अशी माहिती तुम्हाला सांगणार आहोत जी जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. तैमूरच्या आयाचा महिन्याचा पगार तब्बल दीड लाख रुपये इतका आहे. कधी कधी महिन्याच्या पगाराची ही रक्कम पावणे दोन लाखांच्या घरात पोहचते. तैमूरला सांभाळताना जर ओव्हरटाईम झाला तर महिन्याच्या पगाराचा हा आकडा वाढत वाढत जवळपास २ लाखांच्या घरात पोहचतो. शिवाय तिला एक कारसुद्धा देण्यात आली आहे. याच कारमधून ती लहानग्या तैमूरला वांद्रे आणि परिसराचा फेरफटका मारुन आणते. 

कपूर कुटुंबीयांना तैमूरसाठी ही आया जुहूमधील एका खासगी एजन्सीमार्फत पुरवण्यात आली आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या घरी याच एजन्सीमार्फत मेड सर्व्हीस  पुरवली जाते. तुषार कपूर आणि सोहा अली खान यांनाही याच एजन्सीमार्फत मेड सर्व्हीस देण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सगळ्या मेड्स आणि आया यांची सगळी तपासणी या एजन्सीकडून करण्यात येते. यांत पोलीस पडताळणी आणि इतर प्रक्रियांचा समावेश असतो.