Join us  

अर्जुनबरोबर ब्रेकअपच्या चर्चा; एकटीच व्हॅकेशनला गेली मलायका अरोरा, म्हणते- "जास्त काळ चालणारं रिलेशनशिप..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:51 AM

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा सध्या बीचवर व्हॅकेशन एन्जॉय करत आहे आणि तिच्या व्हॅकेशन फोटोंसोबत तिने तिच्या रिलेशनशिपवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले कपल आहेत. गेल्या काही काळापासून या जोडप्याच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत असलेले अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आता वेगळे झाले असल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. नुकतीच मलायका अरोराही अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीतून गायब होती. या सगळ्या दरम्यान, अभिनेत्री सध्या बीचवर व्हॅकेशन एन्जॉय करत आहे आणि तिच्या व्हॅकेशन फोटोंसोबत तिने तिच्या रिलेशनशिपवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.

मलायका अरोराने तिच्या लेटेस्ट व्हॅकेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंसोबतच अभिनेत्रीने दीर्घकालीन रिलेशनशीपबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे नाते तुमच्या शरीर, हृदय आणि मनाचे असेल. त्यांना चांगले वागवा.

अभिनेत्रीची ही पोस्ट समोर येताच, सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिचे आणि अर्जुन कपूरचे ब्रेकअप झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मलायका अरोराची ही पोस्ट चाहत्यांना तिच्या अर्जुन कपूरसोबतच्या नात्यातील अंतराशी जोडताना दिसत आहे.सध्या मलायका अरोरा बीच व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. अभिनेत्री अनेकदा अर्जुन कपूरसोबत व्हॅकेशनला एकत्र जायचे, मात्र यावेळी अर्जुन कपूर तिच्या फोटोंमध्ये दिसला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे रिलेशनशीप चर्चेत आले आहे.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर