Join us

बॉलिवूडमधील 'ही' अभिनेत्री आहे खूपच उंच; सहकलाकाराला स्टुलावर चढून पूर्ण करावा लागला होता सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 15:30 IST

Sushmita sen: उंचीमुळे तिच्या सहकलाकाराला चक्क स्टुलावर उभं राहून चित्रपटातील सीन पूर्ण करावे लागले होते. 

कलाविश्वातील सेलिब्रिटी सोशल मीडियावर कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असतात. यात अनेकदा त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफचीही चर्चा होते. खासकरुन बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो. या अभिनेत्रींविषयी, त्यांच्या लाइफस्टाइलविषयी आणि एकंदरीतच त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच आज आपण अशा एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत. जिच्या उंचीमुळे तिच्या सहकलाकाराला चक्क स्टुलावर उभं राहून चित्रपटातील सीन पूर्ण करावे लागले होते. 

अभिनेत्री प्रियांका चोप्रापासून (priyanka chopra) ते सोनम कपूरपर्यंत (sonam kapoor) अशा कित्येक अभिनेत्री आहेत. ज्या सौंदर्यासोबतच त्यांच्या उंचीमुळे चर्चेत असतात. कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्या खासकरुन त्यांच्या उंचीमुळे ओळखल्या जातात. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे सुश्मिता सेन (Sushmita sen). 

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिची उंची ५ फूट ९.५ इंच इतकी आहे. त्यामुळे अनेकदा चित्रपटांमध्ये काम करतांना दिग्दर्शक, निर्मात्यांना तिच्या उंचीला शोभेल अशा अभिनेत्याची निवड करावी लागते. परंतु, एका चित्रपटामध्ये एका अभिनेत्याला चक्क स्टुलावर उभं राहून चित्रपटातील सीन पूर्ण करावे लागले होते.

दरम्यान, 'क्योंकि मैं झूठ नहीं बोलता' हा अभिनेता गोविंदाचा चित्रपट साऱ्यांनाच ठावूक असेल. या चित्रपटात गोविंदासोबत (govinda) सुश्मिताने स्क्रिन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटातील एक सीन पूर्ण करण्यासाठी गोविंदाला चक्क स्टुलावर उभं रहावं लागलं होतं. हा किस्सा त्याकाळी चांगलाच चर्चेत आला होता. विशेष म्हणजे आजही अनेक चाहते या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.

टॅग्स :सुश्मिता सेनगोविंदाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा