Join us

तमन्ना भाटिया-विजय वर्माचं ब्रेकअप? लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच चाहत्यांना मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:59 IST

Tamannaah Bhatia-Vijay Varma breakup: २०२३ साली आलेल्या 'द लस्ट स्टोरीज 2' सिनेमामुळे तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची ओळख झाली होती.

Tamannaah Bhatia-Vijay Varma breakup:  बीटाऊनमधलं चर्चेतलं कपल विजय वर्मा (Vijay Varma) आणि तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia)  यांचं ब्रेकअप झाल्याचं आता समोर आलं आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार तमन्ना आणि विजयने प्रेमाचं नातं इथेच थांबवलं आहे. यापुढे त्यांनी केवळ चांगले मित्र म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे तमन्ना आणि विजयच्या लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच आता ही बातमी आल्याने दोघांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

२०२३ साली आलेल्या 'द लस्ट स्टोरीज 2' सिनेमामुळे तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची ओळख झाली होती. सिनेमात त्यांच्यात काही इंटिमेट सीन्सही होते. नंतर हे कपल खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत होते. तमन्नासारखी हिरोईन गर्लफ्रेंड असल्याने  विजय वर्माला तर नेटकऱ्यांनी अनेकदा ट्रोल केलं होतं. मात्र दोघांनी ट्रोलिंगकडे दुर्लक्ष केलं आणि ते मनमोकळेपणाने हातात हात घालून फिरायचे. मात्र आता त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. दोघांनी हे नातं इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पिंकव्हिला न्यूज पोर्टलला मिळालेल्या माहितीनुसार, "तमन्ना आणि विजय काही आठवड्यांपूर्वीच वेगळे झाले आहेत. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने हा निर्णय घेतला. भविष्यात दोघंही एकमेकांचे चांगले मित्र बनून राहतील. दोघंही आपापल्या प्रोफेशनल आयुष्यात व्यस्त आहेत. त्यामुळे यापुढेही ते कामावरच लक्ष देणार आहेत."

तमन्ना आणि विजयची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असायची. अवॉर्ड्स, इव्हेंट्स, मूव्ही स्क्रीनिंग्स अशा सगळीकडेच दोघं एकत्र जात होते. दोघांनी आपली प्रायव्हसी जपली होती तरी नातं मात्र उघडपणे कबूलही केलं होतं. यावर्षी दोघं लग्न करतील अशाही चर्चा सुरु झाल्या होत्या. आता अचानक त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. 

वर्कफ्रंटतमन्नाचं 'स्त्री २'मधील 'आज की रात' आयटम साँग खूप गाजलं. याशिवाय तिचा 'सिकंदर का मुकद्दर' सिनेमा रिलीज झाला. तर दुसरीकडे विजय वर्मा 'IC814 द कंदहार हायजॅक' सीरिजमध्ये दिसला.  

टॅग्स :तमन्ना भाटियारिलेशनशिपबॉलिवूडसोशल मीडिया