तमन्ना भाटिया ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तमन्ना भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबतच्या रिलेशनशिपमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तमन्ना भाटिया आणि विराट कोहली एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते असं म्हटलं जातं. मात्र, आता अभिनेत्रीने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तमन्ना आणि विराट यांनी 2012 मध्ये एकत्र जाहिरात शूट केली होती. त्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत अशी जोरदार चर्चा रंगली होती.
तमन्ना भाटिया म्हणाली की, मी विराट कोहलीला फक्त 4 गोष्टी सांगितल्या, पण त्यानंतर आमची भेट झाली नाही. विराटसोबत जाहिरात शूट करणे हा एक मजेदार अनुभव होता यात शंका नाही. खरंतर तमन्ना भाटियाने विराट कोहलीसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. या अफवांमध्ये तथ्य नसल्याचं तिने सांगितले.
सध्या तमन्ना भाटिया अभिनेता विजय वर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तिने अनेकदा विजय वर्मा याच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. तमन्ना सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती तिचे ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करते असते. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लवकरच लस्ट स्टोरीज-२ या वेब सीरिजमध्ये एकत्र दिसणार आहेत. ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
विराट कोहलीने डिसेंबर 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले. दोघंही सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करत असतात. याशिवाय अनुष्का शर्मा सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये दिसते. विराट आणि अनुष्काला वामिका नावाची एक गोड मुलगी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.