Join us

ब्रेकअप झाल्यानंतर तमन्ना भाटियाने ऐकलं 'विजय'चं नाव, अभिनेत्री म्हणाली- "तुम्ही सर्व..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 10:51 IST

तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचं काहीच दिवसांपूर्वी ब्रेकअप झालं. त्यानंतर पापाराझीने विजय नाव घेताच अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (tamannah bhatia)

तमन्ना भाटिया (tamannah bhatia) ही बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री. तमन्ना भाटिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली. यामागचं कारण म्हणजे तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचं  (vijay varma) ब्रेकअप. विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांच्या रिलेशनशीपची चांगलीच चर्चा झाली. परंतु दोघांचं काहीच दिवसांपूर्वी ब्रेकअप झाल्याने सर्वांना धक्का बसला. तमन्ना काल 'ओडेला २' सिनेमाच्या प्रमोशनला उपस्थित होती. यावेळी तमन्नाने 'विजय'चं नाव ऐकताच दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. काय घडलं बघा

तमन्नाने विजयचं नाव ऐकलं अन्..

'ओडेला २' सिनेमाच्या प्रमोशनवेळेस तमन्ना भाटियासमोर विजयचा अप्रत्यक्ष उल्लेख झाला. त्यावेळी अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. झालं असं की, 'ओडेला २'च्या प्रमोशनवेळेस एका पापाराझीने तमन्नाला विचारलं की, "तुमच्या मनात असं कोणतं व्यक्तिमत्व आहे जिच्यावर तंत्र-मंत्राचा वापर करुन तुम्ही विजय प्राप्त करु इच्छिता?" या प्रश्नात 'विजय' शब्द ऐकताच उपस्थित लोकांनी एकच आरडाओरड केला. तमन्नाने हा प्रश्न ऐकताना गाल फुगवलं आणि काहीशी वेगळी प्रतिक्रिया दिली.

या प्रश्नाचं उत्तर देताना ज्याने प्रश्न विचारला होता त्याला उद्देशून तमन्ना म्हणाली की, "मी तुमच्यावरच नियंत्रण मिळवू इच्छिते. तुम्हाला वश केल्यावर सर्व पापाराझी माझ्या मुठीत असतील." अशाप्रकारे ज्याने प्रश्न विचारला होता त्याचीच तमन्नाने फिरकी घेतली. एकूणच विजय नाव ऐकून समोरच्या लोकांनी जल्लोष केला असला तरीही तमन्नाने मात्र धीर आणि संयमाने उत्तर दिलं. तमन्ना भाटिया लवकरच आपल्याला 'ओडेला २' या सिनेमात दिसणार आहे. काहीच दिवसांपूर्वी लव्हबर्ड्स म्हणून चर्चेत असलेल्या तमन्ना आणि विजयचं ब्रेकअप झालं. लग्नाच्या मुद्द्यावरुन तमन्ना आणि विजयची मतं जुळली नाहीत आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला, असं सांगण्यात येतंय.

टॅग्स :तमन्ना भाटियाबॉलिवूड