Join us

तन्मय भट आणि गुरसिमरन खंबा दोघांची AIB मधून एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 9:35 PM

#METOO या मोहिमेनंतर एआयबीला ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर तन्मय भट आणि खंबा यांने एआयबीपासून फारकत घेतली आहे.  

एआयबी या वादग्रस्त आणि तितकाच चर्चित शोचा प्रसिद्ध चेहरा असलेल्या तन्मय भटने त्याच्या पदांचा राजीनामा दिलाय. तन्मय भट हा एआयबीचा सहसंस्थापक आणि सीईओ होता. तन्मयसह गुरसिमरन खंबा यानेही या शोमधून एक्झिट घेतली आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या #METOO या मोहिमेनंतर एआयबीला ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर तन्मय भट आणि खंबा यांने एआयबीपासून फारकत घेतली आहे.  याबाबतचे एक पत्र एआयबीच्या एचआरने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पत्रानुसार तन्मय भटचा एआयबीशी काहीही संबंध नसेल. एआयबीचा सदस्य असलेल्या उत्सव चक्रवर्तीवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. तो महिला सहकाऱ्यांना अश्लील एसएमएस पाठवायचा आणि त्यांच्याशी गैरवर्तन करायचा असा आरोपही झाला होता. ऑस्ट्रेलियातील क्रूझवर झालेल्या शोषणाच्या घटनेला महिलेने वाचा फोडली होती. शिवाय एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचं तिने म्हटलं होतं. मात्र या सगळ्याबाबत माहिती असूनही सीईओ असलेल्या तन्मय भटने कारवाई केली नाही. त्यामुळे तन्मयचे हे वागणं दुर्लक्ष करण्यासारखं नाही असं एआयबीकडून सांगण्यात आले आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल एआयबीने माफीसुद्धा मागितली आहे.

AIBच्या उत्सव चक्रवर्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप, अल्पवयीन मुलींना पाठवले अश्लिल मॅसेज

उत्सव चक्रवर्ती AIBच्या अनेक व्हिडिओमध्ये दिसला होता. मुंबईच्या एका राईटर कॉमेडियनने ‘ट्विटर थ्रेड’च्या माध्यमातून उत्सववर हे आरोप करण्यात आले होते. उत्सव हा अनेक महिला व अल्पवयीन मुलींना त्यांचे नग्न फोटो पाठवण्यात सांगायचा, असा आरोप महिमा कुकरेजा नामक एका ट्विटर युजरने केला होता. यानंतर उत्सवविरोधात एका पाठोपाठ एक अशा अनेक मुलींनी ट्विट केले. उत्सव अश्लिल मॅसेज पाठवायचा आणि न्यूड फोटो मागायचा, असे या मुलींनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी या ट्विटची गंभीर दखल घेतली आहे.दरम्यान उत्सवने हे सगळे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. ज्यांना मी ओळखतही नाही, ते माझ्याविरोधात गेले आहे. त्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही. पण जी कहाणी सांगितली जात आहे ती खोटी असल्याचे त्याने म्हटले होते.