तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादाने अख्खा देश ढवळून निघाला असताना आता तनुश्रीच्या एका फोटोशूटची प्रचंड चर्चा रंगलीय. या फोटाशूटनंतर तनुश्रीला सोशल मीडियावर अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले जात आहे.
तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह सह आरोपींची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करा अशी मागणी तनुश्रीचे वकील नितीन सातपुते यांनी अर्जाद्वारे ओशिवरा पोलिसांकडे केली आहे तनुश्री दत्तासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात १० ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोप - प्रत्यारोप केले जात असून एकाही आरोपीवर कारवाई करण्यात आली नसल्याने खऱ्या - खोट्याचा उलगडा करण्यासाठी सातपुते यांनी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्टची या आरोपींची करावी अशी मागणी केली आहे.