नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता वाद आता एक नव्या वळणावर पोहाचला आहे. नानांवर गैरवर्तनाचे आरोप करणा-या तनुश्रीवर अलीकडे राखी सावंतने गंभीर आरोप केले होते. तनुश्री लेस्बियन आहे़ तिने माझ्यावर अनेकदा बलात्कार केला. ती ड्रग्ज अॅडिक्ट आहेत, असे काय काय राखी बरळली होती. आता तनुश्रीने राखीच्या या आरोपांना उत्तरे दिली आहेत.तनुश्रीने आधीच लेस्बियन व ड्रग्ज अॅक्टिक्ट असल्याचा राखी सावंतचा आरोप फेटाळून लावला आहे. आता ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने राखीचे अन्य आरोपही फेटाळून लावलेत. राखी सावंत कधीच माझी मैत्रिण नव्हती. माझ्या आई-वडिलांनी मला कायम मित्र समजून-पारखून निवडण्याची शिकवण दिली आहे. त्यामुळे राखी सावंतसारखी अशिक्षित, डाऊन मार्केट, चरित्रहिन आणि क्लासलेस लोक माझ्यासोबत मैत्री असल्याचा दावा करत आहेत, हे ऐकून मला वाईट वाटते. मी तिला फक्त एकदा विमानतळावर भेटले होते. त्यावेळी मी विदेशात एका स्टेज शोसाठी निघाले होते. यानंतर अनेकदा टाळूनही तिने मला एकदा गाठले आणि मला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची गळ घातली. येशूवर विश्वास ठेवणार नसशील तर तू नरकात जाशील, असे ती मला म्हणाली. स्वर्ग व नरकाचा खरा मार्ग कोणता, याचे उत्तर त्यावेळी माझ्याकडे नव्हते. हिंदू धर्म आणि मूर्ती पूजा शैतानाची पूजा असल्याचेही ती मला म्हणाली. तिच्या तोंडून हे सगळे ऐकून मी अवाक् झाले होते. २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’च्या त्या घटनेनंतर वर्षभरानंतर अचानक तिने माझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या डोक्यात धर्माबद्दल चुकीचे विचार टाकण्याचा प्रयत्न केला, असे तनुश्रीने सांगितले.तनुश्री दत्ता आतून पूर्णपणे मुलगा आहे. म्हणून तिने केस कापले होते, हा राखीचा दावाही तिने खोडून काढला. मी दीक्षा घेतली होती आणि त्यामुळे मुंडण केले होते. हिंदू आणि बौद्ध धर्माची ती प्रथा आहे. तुम्ही परमेश्वराला समर्पित होऊन तुमचे केस देऊन स्वत:ची ओळख त्यागता, असे तनुश्री म्हणाली.
राखी सावंत मला म्हणायची, येशूला मानणार नसशील तर नरकात जाशील! तनुश्री दत्ताचा दावा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 6:06 PM