बॉलिवूडमध्ये सध्या तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचा वाद सध्या चांगलाच गाजत आहे. नाना पाटेकर यांनी तनुश्रीला एक लीगल नोटीस पाठवली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर नाना पाटेकर यांनी २००८ मध्ये घेतलेल्या एका पत्रपरिषदेचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर झालेल्या घटनेनंतर दुसऱ्या-तिस-या दिवशी नानांनी ही पत्रपरिषद घेतली होती. या पत्रपरिषदेत नानां तनुश्रीचे सगळे आरोप फेटाळताना दिसत आहेत. ‘मला या मुद्यावर स्पष्टीकरण द्यावे लागतेय, याचीच मला लाज वाटतेय,’असे त्यांनी म्हटले आहे. ‘माझ्या ३५ वर्षांच्या करिअरमध्ये माझ्यावर कुणीही असे आरोप केले नाहीत़. ही मुलगी असे का बोलतेय, ते मला माहित नाही. मी तिला केव्हा स्पर्श केला, मला आठवत नाही. पूर्ण शूटींगदरम्यान तिलाचं मला स्पर्श करायचा होता. मला तिला नाही. मला तर दूर पळायचे होते. आपण काय बोलतोय,हे त्या मुलीला कळायला हवे. काय झाले, हे मलाचं अद्याप कळलेले नाही. रिहर्सलनंतर माझे शूटींग संपणार होते. मी तिला म्हटले, बेटा तू व्हॅनमध्ये बस. मला नाचता येत नाही तर मला जास्त रिहर्सलची गरज आहे. सुरूवातीच्या तीन दिवस तिने मला खूप सहकार्य केले. असे काही होते तर तिने तेव्हाच सांगायला हवे होते. मला हे बोलतानाही शिसारी येतेय. मला वाईट वाटतेय. बच्ची को समजना चाहिए की ऐसे आरोप लगाना अच्छा नहीं है. मैं कुछ बोलूंगा तो अच्छा नहीं होगा, असेही ते या व्हिडिओत म्हणत आहेत.
उद्या ८ आॅक्टोबरला नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्दीकी असे सगळे एकत्र येत, तनुश्रीच्या आरोपांना मीडियासमक्ष उत्तर देणार आहेत.या पत्रपरिषदेत नाना या प्रकरणाबद्दल जाहीररित्या आपली बाजू मांडताना दिसतील. २००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याच्या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपाने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे, दिवसागणिक या वादाला एक वेगळेच वळण मिळतेय. या वादात अनेकजण नाना पाटेकर यांची पाठराखण करणारे आहेत, तसेच तनुश्रीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारेही आहेत.