Tanushree Dutta Controversy: मी सत्य बोलण्याची किंमत चुकवतेय...! तनुश्री दत्ताला मिळाल्या दोन कायदेशीर नोटीस!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 09:49 AM2018-10-04T09:49:02+5:302018-10-04T09:51:01+5:30

काल तनुश्रीला दोन कायदेशीर नोटीस मिळाल्या. यापैकी एक नाना पाटेकर यांनी पाठवली असून दुसरी ‘चॉकलेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पाठवली आहे. 

Tanushree Dutta Controversy: Tanushree Dutta confirming receiving notices from Nana Patekar and Vivek Agnihotri | Tanushree Dutta Controversy: मी सत्य बोलण्याची किंमत चुकवतेय...! तनुश्री दत्ताला मिळाल्या दोन कायदेशीर नोटीस!!

Tanushree Dutta Controversy: मी सत्य बोलण्याची किंमत चुकवतेय...! तनुश्री दत्ताला मिळाल्या दोन कायदेशीर नोटीस!!

googlenewsNext

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करणा-या तनुश्री दत्ताला आता कायदेशीर लढाईला सामोरे जावे लागणार आहे. काल तनुश्रीला दोन कायदेशीर नोटीस मिळाल्या. यापैकी एक नाना पाटेकर यांनी पाठवली असून दुसरी ‘चॉकलेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पाठवली आहे. खुद्द तनुश्रीने मध्यरात्री एक स्टेटमेंट जारी करून याची माहिती दिली. ‘आज मला दोन लीगल नोटीस मिळाल्या. यात एक नाना पाटेकरची आहे आणि दुसरी विवेक अग्निहोत्रीची. शोषणाविरोधात आवाज उठवण्याची ही किंमत आहे. भारतात अपमान आणि अधर्म सुरू आहे. विवेक अग्निहोत्री व नाना पाटेकरची टीम माझ्याविरोधात लोकांमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठावरून  गैरसमज पसरवत आहे. बुरखे घातलेले त्यांचे समर्थक सोशल मीडिया आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये ओरडून ओरडून माझ्याविरोधात बोलत आहेत. काल दुपारी मी घरी असताना, माझ्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस लंचब्रेकला गेलेत. यादरम्यान दोन अज्ञान व्यक्तिंनी माझ्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला. माझ्या बिल्डींगच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला. मनसेनेही मला धमकी दिली आहे. मी खरे बोलले म्हणून मला कोर्टात खेचले जात आहे. आता हे प्रकरण कोर्टात आहे. त्यामुळे यासंदर्भात माझे पाठीराखे आणि मीडिया काहीही बोलू शकत नाही. हे प्रकरण मला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत करत आहे. अशा प्रकरणांत केवळ कोर्टाच्या तारखा मिळतात. योग्य निकाल नाही. पीडित आयुष्यभर न्यायाच्या प्रतीक्षेत राहतो. खोटे साक्षीदार उभे केले जातात आणि शेवटी आशाचं संपते. आपल्या देशात जिवंत राहण्यासाठी पूर्वापार संघर्ष करावा लागला आहे. आज माझ्यासोबत जे होतयं, १० वर्षांपूर्वीही तेच होतं. यापासून पिश्चा सोडवण्यासाठीचं मी देशाबाहेर निघून गेले होते. पुन्हा तीच पुनरावृत्ती होणार असेल तर माझे हे नवे आयुष्यही खराब होईल. हेच कारण आहे की भारतात #metoo अभियान यशस्वी होऊ शकत नाही,’असे तनुश्रीने म्हटले आहे.
नाना पाटेकर यांच्याशिवाय तनुश्रीने विवेक अग्निहोत्री यांच्यावरही गैरवर्तनाचा ठपका ठेवला आहे. २००५ मध्ये ‘चॉकलेट : डिप डार्क सिक्रेट’च्या चित्रिकरणावेळी विवेक अग्निहोत्रीने आपल्याशी गैरवर्तणूक केले. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शकाने (विवेक अग्निहोत्रीने ) कोणतीही कल्पना न देता मला संपूर्ण कपडे काढून डान्स करण्यास सांगितले. या दृश्यात मी नव्हते तरीही मी असा टेक द्यावा अशी सूचना त्यांनी मला केली. पण सुदैवाने सुनील शेट्टी आणि इरफान खान त्यावेळी माझ्याबाजूनं उभं राहिले, असा तिचा आरोप आहे.

Web Title: Tanushree Dutta Controversy: Tanushree Dutta confirming receiving notices from Nana Patekar and Vivek Agnihotri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.