Join us

'राखी सावंतमुळे दोन मुलांनी आत्महत्या केली', तनुश्री दत्ताचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 12:01 IST

तनुश्री दत्ता आणि आदिल दुर्रानीने नुकतीच एकत्रित प्रेस कॉन्फरन्स घेतली.

ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आणि पती आदिल दुर्रानीच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय. 'आशिक बनाया' फेम अभिनेत्री तनुश्री दत्ताची (Tanushree Dutta) या ड्रामामध्ये एंट्री झाली आहे. होय तीच तनुश्री दत्ता जिने नाना पाटेकरांवर 'मी टू'चे आरोप केले होते. आता तनुश्रीने राखी सावंतला लक्ष्य केलं आहे. राखीमुळे दोन मुलांनी आत्महत्या केल्याचा खळबळजनक आरोप तिने केला आहे. 

तनुश्री दत्ता आणि आदिल दुर्रानीने नुकतीच एकत्रित प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी तनुश्री म्हणाली, 'आज मी संपूर्ण देशाला सांगू इच्छिते की राखी एक सायकोपॅथ आणि खोटारडी आहे. ती माझ्या चारित्र्यावर काय काय नाही बोलली. ती प्रत्येक गोष्ट खोटी आणि बनावट होती. ती प्रत्येक पाच मिनिटाला खोटं बोलते. ती इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते ज्याचा आपण विचारही करु शकत नाही.'

ती पुढे म्हणाली, 'राखी सावंतसंबंधित एक अशीही घटना आहे जी आजपर्यंत मीडियासमोर आलेली नव्हती. तिच्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केली. ते दोन मुलं राखीचा सामना करु शकत नव्हते म्हणून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. या प्रकरणी राखीवर केसही दाखल आहे. मुलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्याविरोधात केस दाखल आहे.'

या पत्रकार परिषदेत तनुश्रीने अनेक दावे करत राखीची पोलखोल केली.'मी टू' मोहिमेवेळी राखी सावंतने तनुश्रीवर अनेक आरोप केले होते. काही व्हिडिओही बनवले होते. तनुश्री लेस्बियन असून आपल्यासोबत सतत दुष्कर्म करते असा राखीने दावा केला होता. इतकंच नाही तर ती आपल्याला रेव्ह पार्ट्यांना घेऊन जाते असंही राखी म्हणाली होती. तेव्हा तनुश्रीने तिची बाजू मांडली होती तर आता पुन्हा तिने आवाज राखीविरोधात आवाज उठवला आहे.

टॅग्स :तनुश्री दत्ताराखी सावंतबॉलिवूडटेलिव्हिजन