Join us

Tanushree Dutta Nana Patekar controversy : आता राखी सावंतने सांगितली वेगळीच स्टोरी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 10:40 AM

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. आता या वादात कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत हिनेही उडी घेतली आहे. केवळ इतकेच नाही तर तिने एक वेगळीच स्टोरी सांगितली आहे. 

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. आता या वादात कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत हिनेही उडी घेतली आहे. केवळ इतकेच नाही तर तिने एक वेगळीच स्टोरी सांगितली आहे. होय, राखीचे खरे मानाल तर ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटींगवेळी तनुश्री दत्ता ड्रग्ज घेऊन बेशुद्ध पडली होती आणि म्हणून ती गाण्याचे शूट करू शकली नव्हती.‘हॉर्न ओके प्लीज’च्या गाण्याच्या शूटवेळी नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले, असा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. या आरोपानंतर नाना पाटेकर यांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवत, आपल्या आरोपांबद्दल माफी मागण्याची मागणी केली आहे.‘हॉर्न ओके प्लीज’च्या ज्या गाण्याच्या शूटवेळी ही घटना घडली होती, ते गाणे नंतर राखी सावंतने केले होते. तनुश्रीने गाणे शूट करण्यास नकार दिल्यावर ऐववेळी यात राखीची वर्णी लागली होती. त्यामुळे या संपूर्ण घटनेसंदर्भात राखीने विस्ताराने सांगितले आहे.

 तिने सांगितले की, त्या दिवशी मी घरी बसले असताना मला मास्टरजीचा(गणेश आचार्य) फोन आला. राखी, लवकर सेटवर ये. तुला गाणे करायचे आहे, असे ते मला म्हणाले. मी त्यांना गाणे पाठवण्याची विनंती केली. यावर तू फक्त ये. मी गाणे करतोय ना, मग तुला काय करायचे, असे ते मला म्हणाले. त्यांच्या फोननंतर मला नाना पाटेकर यांचाही फोन आला. त्यांनीही मला सेटवर लवकर पोहोचण्यास सांगितले. यानंतर मी घाईघाईत सेटवर पोहोचले. पण सेटवरचे चित्र पाहून मला धक्काचं बसला. काय झाले, हे कळायला मार्ग नव्हता. तिथे मेकअप व्हॅन होती. खूप सारे लोक होते़ मीडिया होता़ तोडफोडही झालेली दिसत होती. मी गणेश आचार्य यांना विचारले तर हे गाणे तनुश्रीचे होते. आम्ही थोडे शूट केलेही. पण आता ती कोआॅपरेट करत नाहीये, असे त्यांनी मला सांगितले. यानंतर मी कॉल करून बघते, असे म्हणून तनुश्रीला कॉल केला. पण तिने माझा कॉनही उचलला नाही़. त्यावेळी डेजी शाह गणेश आचार्य यांची अस्टिस्टंट होती. तिनेचं मला सगळे काही सांगितले. डेजी स्वत: १० वेळा तनुश्रीला बोलवायला गेली होती. पण तिने आपल्या व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा उघडला नाही. यानंतर तनुश्रीच्या मेकअप आर्टिस्टने मला सांगितले की, तनुश्री ३-४ तासांपासून बेशुद्ध आहे. मी का? असे त्याला विचारले असता ती ड्रग्ज घेऊन बेशुद्ध पडली असल्याचे त्याने मला सांगितले. 

 

टॅग्स :राखी सावंततनुश्री दत्तानाना पाटेकर