अभिनेत्री तनुश्री दत्ता आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण गेल्या काही दिवसांपासून ती सतत चर्चेत आहे. होय, महिनाभरापूर्वी भारतात परतलेल्या तनुश्रीमुळे एक अनेक वर्षे जुने प्रकरण समोर आले आहे. ताज्या मुलाखतीत तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या शूटींगवेळी नानाने आपल्याशी गैरवर्तन केले होते. मनसेकडून मला धमकावले होते, असेखळबळजनक आरोप तिने केले. केवळ नाना पाटेकर हेच नाहीत तर कोरिओग्राफर गणेश आचार्य, विवेक अग्निहोत्री यांच्यावरही तिने ठपका ठेवला. माझी मदत करण्याऐवजी या सर्वांनी तमाशा बघितला, असे ती म्हणाली. तनुश्रीच्या आरोपांवरून सध्या बॉलिवूडमध्ये घमासान सुरू आहे, बॉलिवूड दोन गटात विभागले गेले आहे. काहींनी तनुश्रीचे आरोप खोटे आणि पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. पण अनेक जण तनुश्रीची बाजू घेणारेही आहेत.नाना पाटेकर, गणेश आचार्य यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असताना ‘हॉर्न ओके प्लीज’चे दिग्दर्शक राकेश सारंग यांनीही तनुश्रीचे हे आरोप पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. कदाचित तिला पुन्हा कमबॅक करायचे असेल. म्हणून जाणीवपूर्वक तिने हे प्रकरण उखरून काढले असावे, असे त्यांनी म्हटले आहे. कुणालाही फ्लर्ट करायचे असेल तर ती व्यक्ती सर्वांदेखत करेल का, असा सवाल करून त्यांनी नाना पाटेकर यांची बाजू उचलून धरली आहे. खप्रियांका चोप्रा, सोनम कपूर, ट्विंकल खन्ना तनुश्रीच्या बाजूनेअनेकांनी तनुश्रीचे आरोप खोटे ठरवले असले तरी प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, ट्विंकल खन्ना, रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, फरहान अख्तर आदींनी तनुश्रीला पाठींबा दिला आहे.
Tanushree dutta -Nana patekar Controversy : दोन गटात विभागले बॉलिवूड!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 7:54 PM