Join us

तापसी पन्नूने सायकोलॉजिकल थ्रिलर 'ब्लर'चे शूटिंग केले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 2:57 PM

'ब्लर' चित्रपट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. आता ती लवकरच एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसी पन्नू आपली निर्मिती संस्था ‘आउटसाइडर फिल्म्स, अंतर्गत आगामी चित्रपट 'ब्लर'मधून प्रेक्षकांना आणखी एक रोमांचक अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे. 

अजय बहल दिग्दर्शित आणि तापसी आणि गुलशन देवाय्या अभिनीत, पवन सोनी आणि अजय बहल यांनी लिहिलेला हा मानसशास्त्रीय थरारक चित्रपट एका अपरिहार्य परिस्थितीत अडकलेल्या मुलीच्या कथेद्वारे आणि त्यानंतर येणारा थरार आणि नाट्यासोबत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

सुंदर नैनितालमध्ये चित्रीत करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या टीमच्या आनंदाला पारावार उरलेला नाही कारण त्यांनी नुकत्याच छोट्या शहरात ‘ब्लर’चे आव्हानात्मक वेळापत्रक पूर्ण केले आहे.

 नैनितालमध्ये आपल्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी बोलताना दिग्दर्शक अजय बहल म्हणाले की, नैनिताल लेक, मॉल रोड आणि इतर पर्यटन स्थळांसारख्या वास्तविक ठिकाणी शूटिंग करणे विशेषतः गर्दीमुळे कठीण होऊ शकते. आम्ही रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत चित्रीकरण करायचो. पण आमच्या सर्वांसाठी हा एक पूर्णपणे समाधानकारक अनुभव होता. नैनीतालने चित्रपटात सौंदर्य आणि गूढ तितकेच जोडले आहे. 

पवन सोनी आणि अजय बहल यांनी लिहिलेले, झी स्टुडिओज, तापसी पन्नूचे आउटसाइडर फिल्म्स आणि एचेलॉन प्रॉडक्शन्सचा 'ब्लर', हा एक मनोवैज्ञानिक थ्रिलरपट आहे जो तुमच्या अंगावर शहारे आणेल. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :तापसी पन्नू