Join us

कंगना समोर आली तर बोलणार का? तापसी पन्नू म्हणाली, 'तिला बघून मी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 15:07 IST

अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतेच एका मुलाखतीत कंगनाविषयी मत व्यक्त केलं आहे.

आपल्या बेधडक वक्तव्यांनी कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत(Kangana Ranauat). तिने आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींवर काही ना काही कारणाने निशाणा साधला आहे. अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना प्रकाशझोतात आली आहे. नेपोटिझमवर तर तिने सर्वांनाच धारेवर धरले होते. याच मुद्द्यावरुन तिचा अभिनेत्री तापसी पन्नूसोबत (Tapasee Pannu) वाद चांगलाच रंगला होता.

अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतेच एका मुलाखतीत कंगनाविषयी मत व्यक्त केलं आहे. मुलाखतीत तापसीला कंगनासोबतच्या वादाची आठवण करुन दिली आणि तिच्यासोबत परत कधी बोलणार का असा प्रश्न विचारला. यावर तापसी म्हणाली, 'मी यावर काय बोलू. मला नाही वाईट वाटत. खरंच मला माहित नाही. मी पिंक सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी तिला भेटले होते. तेव्हा मी इंडस्ट्रीत नवी होते. तेव्हा केवळ हॅलो आणि धन्यवाद एवढंच आमच्यात बोलणं झालं होतं.'

तापसी पुढे म्हणाली, 'जर कधी ती माझ्यासमोर आली, तर मी जाऊन हॅलो म्हणेन. मी तोंड फिरवून जाणार नाही. मला कुठे काय अडचण आहे, प्रॉब्लेम तर तिला आहे. तिची मर्जी. मला सुरुवातीला झटका लागला होता, ती इतकी चांगली अभिनेत्री आहे. मला सस्ती अभिनेत्री म्हणल्यावर मी तर ते कौतुकाच्या रुपातच घेतले.' 

वाद नेमका काय आहे?

२०१९ मध्ये कंगनाची बहीण रंगोलीने एक विधान केले होते की काही लोक कंगनाची कॉपी करत आपले दुकान चालवत आहेत. पण लक्ष देऊन बघा ते ट्रेलरचं कौतुक करताना तिचं नावंही घेत नाहीत. तापसी कंगनाची सस्ती कॉपी आहे. असंही तिने म्हणले होते.

तापसीने २०१० मध्ये करिअरला सुरुवात केली. २०१३ मध्ये आलेल्या 'चश्मेबहाद्दुर' या कॉमेडी सिनेमातून तिने पदार्पण केले. लवकरच ती शाहरुख खान सोबत 'डंकी' या सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :तापसी पन्नूकंगना राणौतबॉलिवूड