Join us

तापसी पन्नूने खरेदी केली Mercedes-Benz Maybach GLS 600; किंमत ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 4:14 PM

Tapsee pannu: तापसीला लक्झरी कार वापरण्याची  विशेष आवड आहे. यापूर्वीही तिच्याकडे अनेक ब्रँडेड महागड्या गाड्या आहेत.

दमदार अभिनयशैली आणि स्पष्टवक्तेपणा यांच्या जोरावर कलाविश्वात अढळ स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. आजवरच्या कारकिर्दीत तापसीने अनेक सुपरहिट सिनेमा दिले. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायमच चर्चा असते. परंतु, यावेळी तापसी तिच्या नव्या कोऱ्या कारमुळे चर्चेत येत आहे.

तापसीला लक्झरी कार वापरण्याची  विशेष आवड आहे. यापूर्वीही तिच्याकडे अनेक ब्रँडेड महागड्या गाड्या आहेत. याच गाड्यांच्या ताफ्यात आता नवीन Mercedes-Benz Maybach GLS 600 ही नवीन कार अॅड झाली आहे.सध्या सोशल मीडियावर तापसीचे तिच्या नव्या कारसोबतचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. तापसीने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तिच्या कारला घरी नेलं. त्यामुळे सध्या ती आनंदात आहे.

काय आहे तापसीच्या नव्या गाडीची खासियत?

तापसीने खरेदी केलेल्या Mercedes-Benz Maybach GLS 600 या गाडीची किंमत 2.92 कोटी रुपये एवढी आहे. ही गाडी कंपनीची भारतातील प्रमुख SUV आहे, ज्याची किंमत 4 कोटी रुपयांपर्यंत असल्याचं सांगण्यात येतं. या लक्झरी कारमध्ये 4.0 लीटर V8 ट्विन टर्बो इंजिन आहे, जे 550 hp ची पॉवर आणि 730 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.  

टॅग्स :तापसी पन्नूसेलिब्रिटीबॉलिवूड