राज कपूर यांचा नाती, रीमा जैनचा मुलगा आदर जैन काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकला. रणबीर कपूर, करीना कपूरचा तो आतेभाऊ आहे. अलेखा अडवाणीसोबत त्याने हिंदू पद्धतीने विवाह केला. या सोहळ्याला अख्खं कपूर कुटुंब पोहोचलं होतं. यावेळी आदरने दिलेल्या स्पीचमध्ये अलेखाला भेटण्यापूर्वी ४ वर्ष आपण टाईमपास केल्याचं वक्तव्य केलं. यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. कारण त्याचा रोख हा अभिनेत्री तारा सुतारियाकडे होता जिच्यासोबत तो ४ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता. आदरच्या या वक्तव्यावर आता ताराच्या आईने उत्तर दिलं आहे.
आदर जैन (Aadar Jain) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) यांचं रिलेशनशिप जगजाहीर होतं. दोघं इव्हेंट्स, पार्ट्यांना हातात हात घालून पोहोचायचे. तर अलेखा अडवाणी ही ताराचीच मैत्रीण होती. अनेकदा तीही या दोघांसोबत दिसायची. अलेखा आणि आदर एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. आदरने लग्नात आपलं लहानपणापासूनच अलेखावर प्रेम होतं पण आजपर्यंत बाकी सगळा मी टाईमपासच केला असं वक्तव्य केलं.
आता ताराच्या आईने क्रिप्टिक पोस्ट शेअर करत लिहिले, "जर तुमचा बॉयफ्रेंड किंवा नवरा तुमच्याशी कधीही काहीही अपमानजनक किंवा असभ्य बोलला तर त्याला तेच वाक्य एका कागदावर लिहायला सांगा. कारमध्ये बसून त्याच्या आई किंवा मुलीला द्या. जर तो तेच त्याच्या आईला हे बोलू शकत किंवा कोणी दुसरा माणूस त्याच्या मुलीला हे बोलावं असं त्याला वाटत नाही तर त्याने हे तुम्हालाही नाहीच बोललं पाहिजे."