Join us

अवघ्या 14 व्या वर्षी जग सोडून गेली होती ‘रसना गर्ल’, आधीच लागली होती मृत्यूची चाहूल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 5:25 PM

तरूणी सचदेवची दु:खद कहाणी... वाढदिवसाच्या दिवशीच काळाने घातली होती झडप

ठळक मुद्दे 2004 मध्ये मल्याळम चित्रपट  ‘वेल्लीनक्षत्रम’ मधून डेब्यू करत तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘पा’ या सिनेमात तिने अमिताभ बच्चन यांच्या वर्गमैत्रिणीची भूमिका साकारली होती.

‘रसना’ची टीव्हीवर येणारी जाहिरात तुम्हाला आठवत असेलच. आय लव्ह यू रसना म्हणत सर्वांचं मनं जिंकणारी या जाहिरातीतील क्युट चिमुकलीही तुम्हाला नक्कीच आठवत असणार. तिचे नाव तरूणी सचदेव. दुर्दैवाने तरूणी आज आपल्यासोबत नाही. अगदी वयाच्या उण्यापु-या 14 व्या वर्षी तरूणीने जगाचा निरोप घेतला होता. वाढदिवसाच्या दिवशीच तरूणीवर काळाने झडप घातली आणि तरूणी हे जग सोडून गेली. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, तरूणीने अगोदरच तिच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती.

वाढदिवसाच्या दिवशीच अपघात...

14 मे 2012 रोजी तरूणीचा 14 वा वाढदिवस होता. त्या दिवशी ती आणि तिची आई विमानातून प्रवास करत होते. नेपाळच्या अग्नि एअर फ्लाइटचा सीएचटी विमानात 16 भारतीय, 2 डॅनिश रहिवासी आणि तीन चालकाचे असे दल होते. अचानक सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास या विमानाला अपघात झाला व विमानाचे अक्षरश: तुकडे झाले. त्या अपघातात 15 लोक ठार झाले़ यात तरूणी व तिच्या आईचा सहभाग होता़ विमानातील सहा प्रवासी मात्र सुदैवाने बचावले होते.

 मस्करीमध्ये घेतला होता मित्रांचा निरोप...नेपाळला जाण्यापूर्वी तरूणीने आपल्या सर्व मित्रांना मिठी मारत निरोप घेतला होता. ‘ही आपली शेवटची भेट आहे...’, असे मित्रांना मिठी मारताना ती मस्करी म्हणाली होती. तिचे हे शब्द सर्वांनी हसण्यावर नेले होते. ती भेट खरोखरच शेवटची भेट असेन, असे कुणालाच वाटले नव्हते. पण नियतीच्या मनात वेगळेच काही होत़े.  तिच्या मित्रांनी सांगितल्यानुसार, तरुणी याआधी अनेकदा ट्रिपवर गेली होती. पण त्यापूर्वी कधीही तिने त्यांना मिठी मारली नव्हती किंवा असा निरोप घेतला नव्हता. पण कदाचित तरूणीला नकळत का होईना तिच्या मृत्यूची चाहूल लागली असावी... तरूणी च्या अचानक जाण्यामुळे फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. रसना, कोलगेट, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स मोबाइल, एलजी, कॉफी बाइट, गोल्ड विनर, शक्ती मसाला यासारख्या उत्पादनांसाठी अनेक दूरदर्शन जाहिरातींमध्ये तरूणीने काम केले होते. अगदी त्या काळातील ती सर्वात बिझी बाल मॉडेल होती.

तरुणीने स्वत: मंदिरातील अनेक उत्सवांच्या अनेक नाटकांमध्येही भाग घेतला होता. तरूणी वयाच्या 5 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत आली. आणि तीही तिच्या काळातील सर्वाधिक कमाई करणारी बाल कलाकार ठरली होती.   स्टार प्लसचा शो ‘क्या आप पाचवी पास से तेज है?’ या स्पर्धेतही स्पर्धक होती. त्यावेळी शाहरुख खान हा शो होस्ट करत असे. त्यांनी 2004 मध्ये मल्याळम चित्रपट  ‘वेल्लीनक्षत्रम’ मधून डेब्यू करत तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘पा’ या सिनेमात तिने अमिताभ बच्चन यांच्या वर्गमैत्रिणीची भूमिका साकारली होती. 

टॅग्स :बॉलिवूड