दबंग ३ चित्रपटानंतर सलमान खान आगामी चित्रपट राधे : इंडियाज मोस्ट वॉण्टेडमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी सलमान खान व दिग्दर्शक प्रभूदेवा यांनी जोर लावला आहे.राधे चित्रपटाबाबत सलमान खानचे चाहते खूप उत्सुक आहेत. राधेच्या सेटवरून फोटो सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. आता अशी माहिती मिळतेय की राधे चित्रपटाचा क्लायमॅक्स चांगला बनवण्यासाठी सलमान साडे सात कोटी रुपये खर्च करणार आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राधे चित्रपटाचा क्लायमॅक्समध्ये खूप व्हीएफएक्सचा वापर केला जाणार आहे. निर्माते यासाठी बाहुबली व बाहुबली २मधील टेक्निकचा वापर करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार हा क्लायमॅक्स सीन २० मिनिटं मोठा असणार आहे आणि त्यासाठी सलमान साडे सात कोटी रुपये देण्यासाठी तयारदेखील झाला आहे.