Join us

Allu Ramesh Death: अभिनेते अल्लू रमेश यांचं झालं निधन, 52व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 4:07 PM

अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने सर्व सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनामुळे साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

तेलुगू अभिनेता अल्लू रमेश यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते, अल्लू रमेश यांच्या निधनाच्या वृत्ताने तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने सर्व सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचवेळी तेलुगू चित्रपट निर्माते आनंद रवी यांनी माहिती दिली आहे की अभिनेता मृत्यूच्या वेळी त्याच्या मूळ गावी विशाखापट्टणम येथे होता. दिवंगत अभिनेत्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

 निर्माते आनंद रवी यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी एक पोस्ट देखील शेअर केली आहे,  'पहिल्या दिवसापासून तू माझा सर्वात मोठा सपोर्ट होतास, मला अजूनही तुझा आवाज जाणवतो. तू अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला आहेस, आणि तुला विसरणे फार कठीण आहे...' या बातमीनंतर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. ही बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण टॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

अल्लू रमेशच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, अभिनेत्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात थिएटरपासून केली. अभिनेत्याच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट 'चिरुजल्लू' होता. त्यानंतर त्यांनी 'मथुरा वाइन', 'नेपोलियन', 'टोलू बोम्माल्टा', 'वेधी' आणि 'ब्लेड बाबाजी'मध्ये काम केले. अल्लू अखेरचा राजेंद्र प्रसाद यांच्या 'अनुकोनी प्रार्थनाम'मध्ये दिसला होता. मात्र, या अभिनेत्याला खरी ओळख 'नेपोलियन' आणि ''थोलुबुम्मलता' सारख्या चित्रपटातून मिळाली.

ते शेवटचे 2022 मध्ये आलेल्या 'अनुकोनी प्रयाणम' चित्रपटात दिसला होता. 'माँ विडकुलू' या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीच्या वडिलांची भूमिका साकारल्याबद्दलही त्यांचे खूप कौतुक झाले होते.  

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी