दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक चैतन्य (chaitanya) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घराच्या कर्जाचे हप्ते फेडता न आल्यामुळे त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचचल्याचं सांगण्यात येत आहे. चैतन्य याने आत्महत्या करण्यापूर्वी एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी चैतन्य याने नेल्लोर गळफास घेत त्याचं जीवन संपवलं.
चैतन्य याने नेल्लोर क्लबमध्ये आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी त्याने शेवटचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्याने कुटुंबाची, मित्रपरिवाराची माफी मागितली आहे. तसंच त्याच्यावरा ही परिस्थिती का ओढावली हेदेखील त्याने सांगितलं आहे.
व्हिडीओमध्ये काय म्हणाला चैतन्य?
“कोणत्याही अडचणीला सामोरं जावं लागू नये यासाठी माझ्या आई-वडिलांनी बहिणीने पुरेपूर काळजी घेतली. मी माझ्या सर्व मित्रांची माफी मागतो. मी बर्याच लोकांना त्रास दिला आहे आणि मी सर्वांसाठी दिलगीर आहे. पैशाच्या बाबतीत मी माझा चांगुलपणा गमावला. केवळ कर्ज घेणेच नाही तर ते फेडण्याची क्षमताही असावी लागते. पण मी ते करू शकलो नाही. सध्या मी नेल्लोरमध्ये आहे आणि हा माझा शेवटचा दिवस आहे. माझ्या कर्जाशी संबंधित समस्या मी सहन करू शकत नाही,” असं तो या व्हिडीओमध्ये म्हणत असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, चैतन्यच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर दाक्षिणात्य कलाविश्वातही खळबळ माजली आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.तर, कोणत्याही अडचणीवर आत्महत्या हा उपाय नाही, असंही चाहत्यांनी म्हटलं आहे.