Join us

घरबसल्या 'या' OTT प्लॅटफॉर्मवर पाहा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 11:09 IST

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

अभिनेता शाहीद कपूर आणि क्रिती सॅनानच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे.  'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'  हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. सायन्स फिक्शन रोमँटिक कॉमेडी असलेला हा चित्रपट सिनेमागृहात 9 फेब्रुवरी रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगला व्यवसाय केला. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रीलिज झाला आहे. आता घरबसल्या हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. 

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' आजपासून (5 एप्रिल) OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला आहे. सिनेमाचे ओटीटी हक्क ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने विकत घेतले आहेत.  चित्रपटगृहात बघायची संधी हुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता हा सिनेमा ओटीटीवर दाखल झाला आहे. शाहिद कपूरनं  'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "एक प्रेमकथा जी तुमच्या लव्ह स्टोरीची व्याख्या रीबूट करेल!.

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'या सिनेमात शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन ही नवीकोरी जोडी पहिल्यांदाच पडद्यावर पाहायला मिळाली आहे. चित्रपटातील गाणी आणि पोस्टरमध्ये दोघांची जोडी अप्रतिम आहे.  या चित्रपटामध्ये क्रिती ही रोबोटच्या भूमिकेत आहे. जिचे नाव सिफ्रा असते. सिफ्रा ही बॅटरीवर चालणारी रोबोट असते. तर शाहिद कपूर हा एका रोबोटिक तज्ञाच्या भूमिकेत आहे. याशिवाय धर्मेंद्र, डिंपल कपाडिया, राकेश बेदी यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'चे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना शाह यांनी केले आहे. 

टॅग्स :शाहिद कपूरक्रिती सनॉनबॉलिवूडसिनेमा