साऊथ सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार थालापति विजय (Thalapathy Vijay) ची लोकप्रियता देशभरातच नाही जगभरात आहे. तो त्याच्या सिनेमांसोबतच त्याच्या समाजकार्यासाठीही ओळखला जातो. त्याचे वेगवेगळे उपक्रम नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळेच त्याचा लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत जाते. अशात त्याच्या आणखी एका भारी कामाची चर्चा जोरदार सुरू आहे. आता तो गरजू मुलांच्या शिक्षणाच्या मदतीसाठी समोर आला आहे. तो गरिब मुलांसाठी मोफत शाळा उभारत आहे.
विजय लहान मुलं खूप आवडतात. अशात त्याने निर्णय घेतलाय की, तो गरिब मुलांना मोफत शिक्षण देणार. जी मुलं शाळेची फी भरू शकत नाही, पण त्यांना शिक्षणाची आवड असेल त्यांना याचा फायदा होईल. त्यांच्यासाठी विजय एक शाळा बांधत आहे. पण अजून याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. तो चेन्नईच्या थिरूपुरूरमध्ये एका शाळा बांधण्याचं प्लानिंग करत आहे. अशी आशा व्यक्त केली जात आहे की, अभिनेता लवकरच याची घोषणाही करेल. दरम्यान विजय आधीच आपल्या फॅन क्लब्सच्या माध्यमातून तामिळनाडूतील अनेक केंद्रांमध्ये मोफत रेस्टॉरन्ट चालवत आहेत आणि गरजू लोकांना मोफत खाऊ घालत आहे.
दरम्यान, थालापति विजयच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर तो त्याच्या आगामी 'बीस्ट' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नेलसन दिलीपकुमार यांनी केलं आहे. शूटींग झाल्यावर सिनेमा प्रॉडक्शनच्या पुढील टप्प्यात पोहोचला आहे. त्याशिवाय विजयने त्याच्या आणखी एका सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा तो Vamshi Paidipally सोबत करत आहे.या सिनेमाला ‘थालापति 66’ असं टायटल देण्यात आलं आहे.
थालापति विजय शेवटचा 'मास्टर' सिनेमात दिसला होता. हा त्याचा अॅक्शन आणि ड्रामा मुव्ही होता. यात तो विजय सेतुपतिसोबत दिसला होता. दोघांनाही एकत्र बघून फॅन्स खूश झाले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही चांगला चालला होता.