साऊथचा सुपरस्टार थालापति विजय (Thalapathy Vijay) ने काही महिन्यांपूर्वी इम्पोर्टेड लक्झरी कार (Thalapathy Vijay Car Controversy) खरेदी करण्यावरून वादात अडकला होता. त्याला कोर्टाकडून कारवर लागलेल्या टॅक्सचे पैसे भरण्याचा आदेश देण्यात आला होता. जेव्हा विजयने टॅक्स भरून वाद मिटवला होता. आता पुन्हा एकदा तो त्याच्या लक्झरी कारमुळे चर्चेत आला. त्याने अमेरिकेतून ६३ लाख रूपयांची कार खरेदी केली होती. तामिळनाडू सरकारच्या कमर्शिअल टॅक्स डिपार्टमेंटने त्याला याचाही टॅक्स भरण्याचा आदेश दिला होता. विजयकडून मद्रास उच्च न्यायालयात टॅक्स बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली होती.
सप्टेंबर २०२१ मध्ये ७ लाख ९८ हजार रूपये कोर्टाच्या आदेशानंतर एन्ट्री टॅक्सच्या रूपात जमा केले होते. यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये कमर्शिअल टॅक्स डिपार्टमेंटकडून ३० लाख २३ हजार ६०९ रूपये टॅक्स न भरल्याने दंड मागितला होता. आता या प्रकरणाची सुनावणी नुकतीच झाली. यादरम्यान वकीलाने कोर्टात दावा केला की, कारच्या खरेदीवेळी त्यांच्यावर प्रति महिना केवळ २ टक्के दंड लावण्यात येणार. पण असं न करता त्यांच्यावर ४०० टक्के दंड लावण्यात आला. पण कमर्शिअल टॅक्स डिपार्टमेंटने त्याची मागणी बरखास्त करण्याची आणि टॅक्स भरण्यास उशीर केल्याचा दंड लावण्याची विनंती केली.
या सगळ्यावरून हे दिसून येतं की, अभिनेता पुन्हा एकदा टॅक्स वादात अडकला आहे. दुसरीकडे फॅन्सही याच चिंतेत आहेत आणि आशा करत आहेत की त्यांचा लाडका अभिनेता लवकरता लवकर यातून बाहेर पडावा.
विजयच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर थालापति विजय त्याच्या आगामी 'बीस्ट' आणि थालापति ६६' मुळे चर्चेत आहे. थालापति ६६ साठी त्याने राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक वामसी पडिपल्ली यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. काही दिवसांपूर्वी चर्चा सुरू होती की, यात त्याच्यासोबत पूजा हेगडे आणि कियारा अडवाणी दिसणार आहे. पण आता या दोघींचा पत्ता कट झाला असून या सिनेमासाठी रश्मिका मंदानाचं नाव समोर येत आहे.