Join us

Beast Box Office Collection Day 1: थलपति विजयच्या ‘बीस्ट’ने पहिल्याच दिवशी केलं निराश, जाणून घ्या ओपनिंग डेची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 2:46 PM

Beast Box Office Collection Day 1: रिलीजआधी ‘बीस्ट’ची जबरदस्त क्रेज होती. पण प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यावर ही ‘क्रेज’ बॉक्स ऑफिसवर ‘कॅश’ होताना दिसली नाही.

Beast Box Office Collection Day 1:  थलपति विजयचा ‘बीस्ट’ (रॉ) (Beast)हा सिनेमा काल 13 एप्रिलला रिलीज झाला. रिलीजआधी या चित्रपटाची जबरदस्त क्रेज होती. पण प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यावर ही ‘क्रेज’ बॉक्स ऑफिसवर ‘कॅश’ होताना दिसली नाही. ओपनिंग डेला या चित्रपटाने मेकर्सची काहीशी निराशा केली. अर्थात तामिळनाडूत या चित्रपटानं बाजी मारली. पहिल्याच दिवशी तामिळनाडू ‘बीस्ट’ने नेट 27 कोटींचा  आणि ग्रॉस 40 कोटींचा बिझनेस केला. याचसोबत ‘बीस्ट’ने अजीतच्या ‘वलिमै’चा पहिल्या दिवशीच्या 36.17 कोटी कलेक्शनचा रेकॉर्डही मोडला.

हिंदी व्हर्जनने केली निराशा‘बीस्ट’ हा सिनेमा हिंदीत ‘रॉ’ या नावानं प्रदर्शित झाला आहे. तामिळनाडूत थलपति विजयच्या नावावर या चित्रपटाने भलेही रेकॉर्डब्रेक कमाई केली. पण अन्य राज्यांत या चित्रपटाला अपेक्षेनुसार, प्रतिसाद मिळाला नाही.  चेन्नईत या चित्रपटाने केवळ 1.96कोटीचा बिझनेस केला. हिंदी व्हर्जनने तर केवळ 50 लाखांचा गल्ला जमवला. आज सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ रिलीज झालाये. त्यामुळे ‘बीस्ट’समोर मोठं आव्हान आहे. अशात ‘केजीएफ 2’ला हा सिनेमा कशी मात देतो ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.

अशी आहे ‘बीस्ट’ची कथाबीस्टहा चित्रपट काश्मीरजवळ सुरू होतो. वीरराघवन (विजय) हा ‘रॉ’चा अधिकारी तीन महिन्यांपासून एका मिशनची तयारी करत असतो. मात्र ऐनवेळी भारत सरकार मिशन मागे घेण्याचा निर्णय घेते. परंतु वीरने स्वत:च्या बॉसच्या आदेशाविरुद्ध मूळ योजनेनुसार मिशन पूर्ण करण्याच्या निर्णयावर ठाम असतो. तो मिशन यशस्वी करतो. परंतु त्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर होतो. मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या वीरला सेवा सोडण्यास भाग पाडलं जातं आणि उपचारासाठी त्याला घरी परतावं लागतं. काही महिन्यांनंतर, तो ओलीस ठेवलेल्या परिस्थितीत आढळतो. त्याच्या मैत्रिणीसह त्याला एका मॉलमध्ये ओलीस ठेवलं जातं. वीरने पकडलेल्या म्होरक्यांना सोडण्याची दहशतवाद्यांची मागणी असते. पुढे जो काही थरार होतो, तो प्रत्यक्ष पडद्यावर पाहणे मनोरंजक ठरेल.

टॅग्स :Tollywood