Join us  

अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ की अजय देवगणचा  ‘थँक्स गॉड’ बॉक्स ऑफिसवर कोण मारणार बाजी? पाहा आकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 1:09 PM

Thank God and Ram Setu movie Box Office Collection : अक्षयच्या ‘रामसेतू’सोबत अजय देवगण व सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक्स गॉड’ हा सिनेमाही रिलीज झाला आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर यापैकी कोणता चित्रपट बाजी मारणार?

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘राम सेतू’ (Ram Setu) हा बहुप्रतिक्षीत सिनेमा रिलीज झाला आहे. चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी चित्रपटाचं जोरदार कौतुक केले आहे. अक्षय कुमारच्या अभिनयाचं कौतुक होतयं. चित्रपटातील व्हिएफएक्स दृश्य, कथा, क्लायमॅक्स सगळ्यांनी प्रेक्षकांना प्रभावित केल्याचं चित्र आहे. किमान सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहून तरी हेच वाटते.अक्षयच्या ‘रामसेतू’सोबत अजय देवगण (Ajay Devgn) व सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) ‘थँक्स गॉड’ (Thank God) हा सिनेमाही रिलीज झाला आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर यापैकी कोणता चित्रपट बाजी मारणार? तर कमाईचा अंदाज बघता अक्षयचा ‘रामसेतू’ अजय देवगणच्या ‘थँक्स गॉड’वर भारी पडेल असं चित्र आहे.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट सुमित काडेल यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, अक्षय कुमारचा ‘रामसेतू’ ओपनिंग डेला 15 ते 17 कोटींचा बिझनेस करू शकतो. तर अजयचा ‘थँक्स गॉड’ 10 ते 10 कोटींचा गल्ला जमवू शकतो. अर्थात सध्या हा अंदाज आहे. सुमित काडेल यांच्यानुसार, दोन्ही चित्रपटांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला फारसा प्रतिसाद नाही. मात्र सुट्ट्यांचा फायदा या दोन्ही चित्रपटांना होऊ शकतो.अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘रामसेतू’ ‘थँक्स गॉड’पेक्षा पुढे असला तरी प्रतिसाद थंड आहे.  अक्षयच्या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत ‘रामसेतू’ चं बुकिंग   कमी झालं आहे.  ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार अ‍ॅडव्हान्स बुकिंगदरम्यान ‘रामसेतू’ची फक्त 39000 तिकिटेच विकली गेली आहेत. हा आकडा अक्षयच्या ‘पृथ्वीराज’पेक्षाही कमी आहे.  शमशेरा, विक्रम वेधा  या चित्रपटांच्या तुळनेतही ‘रामसेतू’ला अगदीच थंड प्रतिसाद मिळाला आहे.  

सोशल मीडियावरच ‘रामसेतू’चा धुमाकूळसोशल मीडियावर ‘रामसेतू’चं जोरदार कौतुक होत आहे. एका युजरने ‘रामसेतू’ला 5 पैकी 4 स्टार दिले आहेत. अक्षयला फुल आॅफ एनर्जी म्हटलं आहे.

एका अन्य युजरने ‘रामसेतू’ हे बेस्ट दिवाळी गिफ्ट असल्याचं म्हटलं आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना आवडला आहे.‘रामसेतू’  या चित्रपटात अक्षय कुमार याच्यासह जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्या मुख्य भूमिका आहेत तर ‘थँक गॉड’मध्ये अजय देवगण व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :अक्षय कुमारअजय देवगणबॉलिवूड