अक्षय कुमार(Akshay Kumar), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) यांच्या बहुप्रतिक्षित 'राम सेतू' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला. अक्षय कुमारचे मागील तीन चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर सर्वांच्या नजरा राम सेतुवर खिळल्या होता. प्रेक्षाकांच्याही चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या त्यावर सिनेमा खरा उतरला. दुसरे म्हणजे अजय देवगण (Ajay Devgn)आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) स्टारर 'थँक गॉड' (Thank God) झाला रिलीज झाला. पाहिल्याच दिवशी राम सेतुने 'थँक गॉड' चित्रपटाला जबरदस्त टक्कर दिली.
पहिल्या दिवसाचे आकडे काय होते?पहिल्या दिवशी राम सेतूचे कलेक्शन 15 कोटी 25 लाख रुपये होते. चित्रपटातील अक्षय कुमारचा लूक, त्याचा अभिनय, क्लायमॅक्स, VFX आणि कथानकानेही प्रेक्षकांना प्रचंड प्रभावित केले. यासह हा चित्रपट अक्षय कुमारचा 2022 मधील सर्वोत्कृष्ट ओपनर चित्रपट ठरला.
'थँक गॉड' या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 8.10 कोटी रुपये कमावले. त्यानुसार अक्षय कुमारच्या चित्रपटाने अजय देवगणच्या चित्रपटापेक्षा जवळपास दुप्पट कमाई केली. इतकेच नाही तर राम सेतू हा या वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला.
Box Office Day 2दुसऱ्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर, अर्ली ट्रेंड्सनुसार, राम सेतूने 10.60 कोटी कमावले आहेत. तर अजय, रकुल आणि सिद्धार्थचा चित्रपट दुसऱ्या दिवशी काही खास दाखवू शकला नाही. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे. मात्र, हे आकडे अद्याप निश्चित झालेले नाहीत. थोड्याच वेळात अधिकृत आकडे बाहेर येतील, जे त्याच्या जवळपास आहेत.
म्हणजेच राम सेतू थँक गॉडला जबरदस्त मात देत असल्याचे दिसतोय. बातम्यांवर विश्वास ठेवला तर, चित्रपटाच्या कमी कलेक्शन मागील कारण म्हणजे रिलीजपूर्वी झालेला वाद. थँक गॉडचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. चित्रपटात हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवण्यात आली असून त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे.