Join us

'राम तेरी गंगा मैली'मध्ये मंदाकिनीच्या पतीच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्यानं कमी वयात जगाचा घेतला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 5:15 PM

Rajiv Kapoor : 'राम तेरी गंगा मैली'मध्ये मंदाकिनीच्या पतीची भूमिका राजीव कपूर यांनी साकारली होती.

राजीव कपूर (Rajiv Kapoor) हे त्यांचे भाऊ ऋषी कपूर (Rishi Kapoor) किंवा रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांच्याइतके यशस्वी होऊ शकले नाहीत. बॉलिवूडचा शो मॅन म्हटल्या जाणार्‍या राज कपूर यांचा मुलगा असूनही त्यांना अपयश आले. 'एक जान है हम' या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. त्यांनी लव्हर बॉय आणि काही चित्रपटांमध्ये जबरदस्त अभिनय केला. राम तेरी गंगा मैली हा त्यांचा मोठा गाजला होता. या चित्रपटात मंदाकिनी (Mandakini) त्यांची नायिका होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अजरामर झाली. एक प्रतिभावान अभिनेता आणि कपूर घराण्यातील असूनही, तो व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखू शकला नाही आणि त्याचे आयुष्य खूप संकटांतून गेले.

रणधीर कपूर यांनी राजीव कपूर यांच्याबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, 'आयुष्यातील काही दुर्दैवी घटनांमुळे' ते त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकले नाही. वास्तविक राजीव कपूर यांचे २००१ मध्ये आरती सभरवालसोबत लग्न झाले होते. हे लग्न फक्त दोन महिने टिकले. त्यांच्या आयुष्यात अनेक दुर्दैवी घटना घडल्या, ज्यामुळे ते भरकटले आणि निराशेच्या गर्तेत गेले. वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे ते आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकले नाहीत. कपूर घराण्यातील ते सर्वात हुशार होते. त्यांनी एका चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. हा चित्रपट म्हणजे १९९६ साली रिलीज झालेला प्रेम ग्रंथ. जो फ्लॉप ठरला.

रणधीर यांनी सांगितले होते की, अयशस्वी लग्नानंतर राजीव यांच्या काही मैत्रिणी होत्या, पण त्यांना पुन्हा लग्न करण्याची इच्छा नव्हती. ते निराश झाले. मला भीती होती की राजीव यांचे काही चुकले तर ते दारूमुळे होईल, पण तो मरेल असे वाटले नव्हते. राजीव यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले.

टॅग्स :राजीव कपूरमंदाकिनी