Join us  

'हाउसफुल ५'मध्ये अक्षय कुमारसोबत झळकणार हा अभिनेता, निर्मात्यांनी केलं कन्फर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 11:42 AM

Housefull 5 : बॉलिवूडचा लोकप्रिय फ्रँचायझी चित्रपट 'हाऊसफुल' म्हणजेच 'हाऊसफुल ५'च्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता निर्मात्यांनी या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट देऊन लोकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

अक्षय कुमार(Akshay Kumar)च्या 'हाऊसफुल' (Housefull) चित्रपटाचे आतापर्यंत चार भाग प्रदर्शित झाले आहेत. चित्रपटाच्या चारही भागांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या फ्रँचायझीच्या पाचव्या भागाची म्हणजेच 'हाऊसफुल ५'(Housefull 5)ची घोषणा झाल्यापासून ते चर्चेत आहे आणि लोक ते पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने लोकांची निराशा झाली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्यासोबत अभिषेक बच्चन देखील दिसणार असल्याचे निर्मात्यांनी गेल्या मे महिन्यात सांगितले होते. आता निर्मात्यांनी 'हाऊसफुल ५' चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. 'हाऊसफुल ५' चित्रपटात या अभिनेत्याच्या आगमनाने कॉमेडीचा डोस दुप्पट होणार आहे.

बॉलिवूडचा लोकप्रिय फ्रँचायझी चित्रपट 'हाऊसफुल' म्हणजेच 'हाऊसफुल ५'च्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता निर्मात्यांनी या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट देऊन लोकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. वास्तविक, चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर संजय दत्तसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत लिहिले आहे की, 'संजय दत्त हाऊसफुल ५ फॅमिलीमध्ये सामील होत असल्याची घोषणा करताना एनजीई कुटुंबाला आनंद होत आहे. वेडाने भरलेल्या या पुढच्या प्रवासात काम करण्यासाठी उत्सुक आहे. 

मेकर्सनी मे महिन्यात सांगितले होते की अभिषेक बच्चन पुन्हा या फ्रँचायझी चित्रपटात दिसणार आहे. वास्तविक अभिषेक बच्चन 'हाऊसफुल ३' मध्ये दिसला होता आणि आता तो 'हाऊसफुल ५' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

'हाऊसफुल ५' चित्रपटाची रिलीज डेटतरुण मनसुखानीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'हाऊसफुल ५' चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट २०२४ मध्ये यूकेमध्ये सुरू होणार आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन आणि संजय दत्त यांचा चित्रपट 'हाऊसफुल ५' ६ जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'हाऊसफुल ५' हा चित्रपट २०२५ च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे आणि त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

टॅग्स :अक्षय कुमारसंजय दत्त