Join us

'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 17:55 IST

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करिअरच्या सुरूवातीला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.

अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chaddha) सध्या संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' (Heeramandi Web Series) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या मालिकेत अभिनेत्रीला महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. रिचा आज इंडस्ट्रीतील एक मोठे नाव बनले आहे. मात्र, करिअरच्या सुरुवातीला तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.

रिचा चड्ढाने तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितले होते. एका मुलाखतीत ती म्हणाली की, 'याआधी अनेकदा मला समजत नव्हते. मी तरुण आणि मस्त होते. एकदा एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला की आपण रात्रीचे जेवण करूया. त्यावेळेस मी ती परिस्थिती समजून घेण्यास खूप निरागस होते आणि मी म्हणाले की मी आधीच जेवण केले आहे आणि मग त्याने रात्रीच्या जेवणाचा आग्रह केला.

मग मी तिथून पळ काढला....

'मग तो स्पर्श करत मला म्हणाला की आपण जेवण करूया. मग तो काय म्हणतोय ते मला समजले. मग मी तिथून पळ काढला. अभिनेत्री म्हणून प्रस्थापित झाल्यानंतरही माझ्या बाबतीत असे घडले. मी त्यातून बचाव करण्यात यशस्वी ठरले. मला खात्री आहे की यामुळे मी बरेच प्रकल्प गमावले आहेत, परंतु काही फरक पडत नाही.

वर्कफ्रंट

रिचा चड्ढा २००८ साली ओये लकी! लकी ओयेमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती २०१० मध्ये बेनी अँड बबलूमध्ये दिसली. गँग्स ऑफ वासेपूरच्या दोन्ही भागांमध्ये ती दिसली होती. फुक्रे, शॉर्ट्स, गोलियों की रासलीला-रामलीला, मसान, मैं और चार्ल्स, चॉक अँड डस्टर, जिया और जिया, फुक्रे रिटर्न्स, लव्ह सोनिया, शकीला, घूमकेतू, फुक्रे 3, अभी तो पार्टी शुरू हुई है या चित्रपटांमध्ये ती दिसली. .

अली फजलसोबत रिचा चड्ढाने केलं लग्न

रिचाने २०२२ मध्ये अभिनेता अली फजलसोबत लग्न केले. आता रिचा गरोदर आहे आणि प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. हीरामंडीच्या प्रमोशनमध्येही ती पाहायला मिळाली.

टॅग्स :रिचा चड्डा