Join us

'आदिपुरुष'ची तब्बल १० हजारपेक्षा जास्त तिकीटं मोफत वाटप करणार, साऊथच्या प्रसिद्ध निर्मात्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 1:25 PM

'द काश्मीर फाईल्स' च्या निर्मात्याने घेतला निर्णय

ओम राऊत (Om Raut) यांचा रामायणावर आधारित 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा खूप चर्चेत आहे. व्हीएफएक्स, सिनेमातील कास्ट, गाणी यामुळे सिनेमा नक्कीच आवडेल अशी निर्मात्यांना आशा आहे. सुरुवातीला व्हिएफएक्समुळे आणि रावणाच्या लुकमुळे सिनेमा प्रचंड ट्रोल झाला होता. यानंतर चुका  सुधारुन पहिला ट्रेलर लॉंच करण्यात आला. ट्रेलरला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. 'आदिपुरुष'चे १० हजार तिकीटं मोफत देण्याचा निर्णय साऊथचे निर्माते अभिषेक अग्रवाल (Abhishek Agarwal) यांनी घेतला आहे. अभिषेक अग्रवाल यांनीच 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाची निर्मिती केली होती.

निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी ट्वीट करत लिहिले, "आदिपुरुष हा आयुष्यात एकदा तरी अनुभवावा असा भव्यदिव्य सिनेमा आहे. जो सगळ्यांनी पाहायलाच हवा. प्रभू श्रीरामाचा भक्त म्हणून मी एक निर्णय घेतला आहे. तेलगंणातील  सरकारी शाळा, अनाथाश्रम, आणि वृद्धाश्रमांमध्ये १० हजारांपेक्षा जास्त तिकीटं मोफत वाटप करणार आहे. यासाठी गुगल फॉर्ममध्ये तुम्ही तुमचे डिटेल्स भरा म्हणजे ते व्हेरिफाय करुन तुम्हाला तिकीटं देण्यात येतील. 'जय श्रीराम' चा जयघोष सर्वत्र करुया."

 'आदिपुरुष' सिनेमा ओम राऊत यांनी दिग्दर्शित केला आहे.  यामध्ये प्रभास, क्रिती सेनन, देवदत्त नागे यांची प्रमुख भूमिका आहे. आदिपुरुष हा बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मेगामूव्ही असेल असं बोललं जात आहे. तर अजय अतुल यांनी सिनेमाचं संगीत दिग्दर्शन केलंय. 

टॅग्स :आदिपुरूषसिनेमातिकिटप्रभासक्रिती सनॉनदेवदत्त नागे