अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २५ दिवस झाले आहेत आणि या चित्रपटाने जगभरात ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची तर रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळत आहेत. या चित्रपटातला एक सीन तुम्हाला धडकी भरायला लावणारा ठरला आहे. त्यात मुघल सैन्य स्वराज्याच्या दिशेने हल्ला करण्यासाठी येतात तेव्हा एक मुलगी त्यांच्या निशाण्यावर येते. ते तिला जाळून टाकतात. हा सीन जिच्यावर चित्रीत झाला आहे, तो स्टंट एका मराठमोळ्या मुलीने साकारला आहे.
छावा सिनेमात जेव्हा औरंगजेब त्याची लाखोंची फौज घेऊन स्वराज्याचे दिशेने दाखल होतात तेव्हा शेळ्या मेंढ्या वळणारी ही तरुणी काहीतरी विचित्र घडणार याचा संकेत देते. त्यावेळी मागून येणारे मुघल सैन्य तिला जाळून टाकताना दिसतात. हा स्टंट करणारी मुलगी मराठमोळी आहे.तिचं नाव आहे साक्षी सकपाळ.
'छावा'ने 'गदर २'लाही टाकलं मागेविकी कौशलच्या छावा या चित्रपटाने सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर २ चित्रपटाला मागे टाकले आहे आणि दहाव्या क्रमांकावर आला आहे. सॅल्कनिकने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाने २५ व्या दिवशी ६.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई गदर २च्या हिंदी एकूण ५२५.७ रुपयांपेक्षा जास्त आहे. आत्तापर्यंत चित्रपटाची कमाई ५२६.३१ कोटींवर पोहोचली आहे.