Join us

Vidya Balan : एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट...! पुन्हा येतोय ‘द डर्टी पिक्चर’, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 6:14 PM

The Dirty Picture : सुमारे दशकभरानंतर विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’ या सिनेमाच्या सीक्वलची चर्चा सुरू झाली आहे. होय, ‘द डर्टी पिक्चर’च्या सीक्वलवर काम सुरू झालं आहे.

एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट..म्हटलं की आठवतो तो एकच सिनेमा... तो म्हणजे विद्या बालनचा (Vidya Balan ) ‘द डर्टी पिक्चर’... 2011 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या सिनेमातील विद्याच्या कामाचं अपार कौतुक झालं होतं. साऊथ सेन्सेशन ‘सिल्क स्मिता’च्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात विद्यानं जबरदस्त अभिनय केला होता. आता सुमारे दशकभरानंतर विद्याच्या या सिनेमाच्या सीक्वलची चर्चा सुरू झाली आहे. होय, ‘द डर्टी पिक्चर’च्या  (The Dirty Picture) सीक्वलवर काम सुरू झालं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘द डर्टी पिक्चर’च्या सीक्वलमध्ये सिल्क स्मिताच्या तरूपणाईची कथा दाखवली जाणार आहे. काही रिपोर्टनुसार, सीक्वलची कथा पहिल्या पार्टपेक्षा अगदी वेगळी असणार आहे. एकता कपूर दीर्घकाळापासून या चित्रपटाच्या सीक्वलचा प्लान बनवत होती. आता यावर्षाअखेर तिचा हा प्लान पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.

विद्या नाही या अभिनेत्रींच्या नावांची चर्चा‘द डर्टी पिक्चर’मध्ये विद्या होती. हा सिनेमा तिचा सिनेमा म्हणूनच ओळखला जातो. पण ‘द डर्टी पिक्चर’च्या सीक्वलमध्ये अर्थात ‘द डर्टी पिक्चर 2’साठी विद्याऐवजी दुसºयाच अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. होय, चर्चा खरी मानाल तर या ‘द डर्टी पिक्चर 2’साठी क्रिती सॅनन आणि तापसी पन्नू या अभिनेत्रींशी संपर्क साधण्यात आला आहे. आता यापैकी कुणाचं नाव फायनल होतं ते कळेलच.

‘द डर्टी पिक्चर’ ऑफर झाल्यावर अशी होती विद्याची रिअ‍ॅक्शन...‘द डर्टी पिक्चर’ बोल्ड सिनेमा होता. या चित्रपटात विद्या बोल्ड रूपात दिसली होती. इतका बोल्ड सिनेमा ऑफर झाला तेव्हा विद्याची पहिली प्रतिक्रिया काय होती, तर ती सुद्धा हैराण होती. तुम्हाला खरंच हा सिनेमा माझ्यासोबत करायचा आहे, असा एकच प्रश्न ती वारंवार डायरेक्टरला करत होती. इतका बोल्ड सिनेमा साईन केल्यावर आईबाबाची काय रिअ‍ॅक्शन असेल, ही भीती देखील तिला होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंग सुरू असताना तिला हाच एक प्रश्न छळत होता. स्क्रिनिंगनंतर तिचे आईबाबा बाहेर आले, तेव्हा तिचे बाबा टाळ्या वाजवत होते आणि आईच्या डोळ्यांत अश्रू होते. सिनेमात विद्या बालनचं पात्र मरताना दिसते, ते पाहून आई भावुक झाली होती. बाबा लेकीचा अभिनय पाहून दंग झाले होते. एका मुलाखतीत खुद्द विद्याने हे सांगितलं होतं.

टॅग्स :विद्या बालनतापसी पन्नूक्रिती सनॉनबॉलिवूड