वॉशिंग्टन - प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री जेनिफर गुडविक हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगते की, एकदा मी माझ्या मैत्रिणीला माझ्या पतीचे स्पर्म देण्याची ऑफर दिली होती. जेनिफर गुडविन ही सध्या ४३ वर्षांची आहे. तसेच तिचा जोश डल्लास हा सुद्धा अभिनेता आहे. या अभिनेत्रीने सांगितले की, तिची मैत्रिण सिंगल आहे. तसेच तिने आई बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. SiriusXM’s Pop Culture Spotlight नावाच्या कार्यक्रमामध्ये जेनिफर गुडविन हिने हा गौप्यस्फोट केला आहे.
जेनिफर गुडविन हिला वाटत होते की, तिच्या पतीच्या स्पर्मचा वापर करून तिची मैत्रिण ही सिंगल मदर बनावी अशी तची इच्छा होती. गेल्या काही काळात जगभरात स्पर्म डोनेशन आणि आयव्हीएफच्या माध्यमातून आई बनणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक महिला ह्या आयव्हीएफ आणि सरोगसीच्या माध्यमातून मुलांना जन्म देत आहेत.
या अभिनेत्रीने सांगितले की, तिची ही ऑफर तिच्या मैत्रिणीने आणि तिच्या पतीने स्वीकारली नाही. दोघांनीही ही ऑफर स्वीकारल्यास पुढे अनेक अडचणी उद्भवू शकतात, असे कारण दिले. तर जेनिफर गुडविन हिने सांगितले की, तिला वाटायचे की, तिच्या मैत्रिणीला मुले असावीत. असे होऊ शकते असे तिला वाटायचे. तसेच तिच्या पतीच्या माध्यमातून अजून एक बाळ जगात येईल, हा विचार मला सुखावून जायचा. दरम्यान, जेनिफर गुडविन हिला स्वत:ची दोन मुले आहेत.
जेनिफर गुडविन हिचा पती आणि तिच्या मैत्रिणीने तिच्या या कल्पनेचे कौतुक केले. मात्र त्यावर अंमलबजावणी करण्याच नकार दिला. तर जेनिफर गुडविनने तिच्या पतीला समजावण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही मुलाच्या जीवनातून बाहेर व्हाल असे नाही. तर तुम्ही माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यामध्ये सहभागी व्हाल. बल्कि तुम तो मेरी बेस्ट फ्रेंड की जिंदगी में शामिल हो.जोश डल्लास आणि जेनिफर गुडविन यांचा विवाह २०१४ मध्ये झाला होता. या जोडप्याची दोन मुले आहेत. एकदा जोश डल्लासने पत्नीबाबत प्रतिक्रिया देताना जेनिफर गुजविन ही सर्वात चांगली आई असल्याचे म्हटले होते.